Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाचणीची भाकरी करताना तुकडे पडतात-वातड होते? ‘ही’ घ्या नाचणीची भाकरी करण्याची परफेक्ट कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2025 14:39 IST

Here's the perfect recipe for making ragi bhakri, easy way to make perfect bhakri, round and soft : नाचणीची भाकरी करताना तुकडा पडतो? पाहा कशी करायची.

महाराष्ट्रात भाकरी हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. विविध प्रकारच्या भाकरी केल्या जातात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे नाचणीची भाकरी. नाचणीची भाकरी ही पारंपारिक मराठी जेवणातील अत्यंत पौष्टिक आणि पोटभरीची भाकरी मानली जाते. ( Here's the perfect recipe for making nachni bhakri, easy way to make perfect bhakri, round and soft )तिचा  सुगंध, खुसखुशीतपणा आणि शरीराला मिळणारी ताकद यामुळे हिवाळ्यात नाचणीची भाकरी विशेष आवडीने खाल्ली जाते. नाचणीचे पीठ कोरडे असल्यामुळे भाकरी करताना ती तुटते आणि चांगली भाजली जात नाही. पण योग्य पद्धत वापरल्यास नाचणीची भाकरी अतिशय मऊ, गोलाकार आणि खमंग करता येते.

भाकरीचे पीठ एकदम व्यवस्थित मळले गेले तरच भाकरी चांगली होते. त्यामुळे पीठ मळताना काळजी घ्यायची. नाचणीच्या पिठात कोमट किंवा गरम पाणी घातल्यास पीठ छान एकजीव होते आणि भाकरीला आवश्यक अशी लवचिकता मिळते. पीठ मळून झाल्यावर ते काही मिनिटे झाकून ठेवणे महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे त्यातील ओलावा समान रीतीने पसरतो. भाकरी पसरताना हातावर थोडे पाणी लावल्यास पीठ सहज पसरते आणि भाकरी गोल होते. भाकरी पसरताना जास्त दाब न देता हलक्या हाताने कडेकडेने भाकरी थापायची. म्हणजे भाकरी न तुटता छान होते. तसेच जर भाकरी तव्यावर तुटत असेल तर मग भाकरीचा आकार जरा लहान ठेवायचा. तवा मध्यम आचेवर तापलेला असायला हवा, खूप तापलेला तवा भाकरी जाळतो, तर मंद आच भाकरी कडक करतो. भाकरी शेकताना हलके दाब दिल्यास ती फुलते आणि तिचा खुसखुशीतपणा अधिक टिकतो. भाकरी शेकल्यानंतर ती गरम ठेवण्यासाठी झाकून ठेवू नये, कारण वाफेमुळे ती मऊ पडून चिवट होते.

नाचणीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे तितकेच उल्लेखनीय आहेत. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडे, दात आणि सांधे मजबूत राहतात. लोहतत्त्व भरपूर असल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि थकवा कमी जाणवतो. नाचणीतील फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असणाऱ्यांसाठी ती सुरक्षित पर्याय ठरते. तसेच प्रथिने आणि अमिनो आम्ले शरीराला ऊर्जा देतात आणि पेशींना मजबुती मिळवून देतात.

एकूणच नाचणीची भाकरी ही चवीने उत्तम, आरोग्याने समृद्ध आणि सहज पचणारी भाकरी आहे. योग्य पद्धतीने केली तर तिचा खुसखुशीतपणा आणि सुगंध जेवणाचा आनंद वाढवतो. रोजच्या आहारात ही भाकरी समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात आणि आरोग्य अधिक तंदुरुस्त राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect Nachni Bhakri Recipe: Soft, Round, and Delicious Every Time!

Web Summary : Nachni bhakri, a Maharashtrian staple, is nutritious and filling. Proper dough preparation with warm water is key. Cook on medium heat, pressing lightly. Rich in calcium, iron, and fiber, it aids digestion and boosts energy.
टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स