Lokmat Sakhi >Food > 'या' हिरव्या शेंगांचं सूप म्हणजे पोषक तत्वांचा खजिना, फायदे वाचाल तर रोज प्याल, पाहा रेसिपी

'या' हिरव्या शेंगांचं सूप म्हणजे पोषक तत्वांचा खजिना, फायदे वाचाल तर रोज प्याल, पाहा रेसिपी

Drumstick Soup Benefits : शेवग्याच्या सूपाचे काय काय फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत. सोबतच सूप कसं बनवावं हेही पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:03 IST2025-08-23T13:02:06+5:302025-08-23T13:03:31+5:30

Drumstick Soup Benefits : शेवग्याच्या सूपाचे काय काय फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत. सोबतच सूप कसं बनवावं हेही पाहणार आहोत.

Healthy and tasty drumstick soup, know its benefits and how to make this | 'या' हिरव्या शेंगांचं सूप म्हणजे पोषक तत्वांचा खजिना, फायदे वाचाल तर रोज प्याल, पाहा रेसिपी

'या' हिरव्या शेंगांचं सूप म्हणजे पोषक तत्वांचा खजिना, फायदे वाचाल तर रोज प्याल, पाहा रेसिपी

Drumstick Soup Benefits : वेगवेगळ्या भाज्या या पोषक तत्वांचा खनिजा असतात. पण जगात एक अशी भाजी जी सगळ्यात पोषक मानली जाते. ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा, पानं आणि फुलं. शेवग्याच्या शेंगांमध्ये इतके पोषक तत्व असतात, जी इतर कोणत्याही भाज्यांमध्ये आढळत नाहीत. या शेंगांमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई, कॅल्शिअम, आर्यन आणि प्रोटीनसोबतच इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. शेवग्याच्या शेंगांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. शेवग्याचं सूपही (Shewaga Soup) खूप फायदेशीर असतं. अशात शेवग्याच्या सूपाचे काय काय फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत. सोबतच सूप कसं बनवावं हेही पाहणार आहोत.

शेवग्याचे फायदे

शेवग्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. सोबतच ही भाजी पचन तंत्रासाठी खूप फायदेशीर असते. यातील कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात. त्याहूनही एक महत्वाचा फायदा म्हणजे शेवग्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडून बॉडी डिटॉक्स करण्यास मदत मिळते. हेच नाही तर शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉलही कमी होतं. जे लोक मांस खात नाही त्यांना यातून भरपूर प्रोटीन मिळतं. ज्यामुळे शरीरातील स्नायून मजबूत होतात.

हिवाळा किंवा पावसाळ्यात हे सूप खूप जास्त फायदेशीर ठरतं. कारण यानं शरीराचा इम्यूनिटी वाढलं आणि वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. सोबतच शरीर आतून गरम राहतं. ज्यामुळे सर्दी - खोकला होण्याचा धोकाही कमी असतो.

सूप बनवण्यासाठीचं साहित्य

सूप बनवण्यासाठी शेवग्याच्या दोन शेंगा, तीन ते चार लसणाच्या कळ्या, कोथिंबिरीच्या काड्या, कोथिंबीर, बटर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, चिमुटभर हळद, आलं, टेस्टनुसार मिठाची गरज पडेल.

कसं बनवाल सूप?

शेवग्याचं सूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी शेंगा चांगल्या धुवा आणि त्यांचे तीन ते चार तुकडे करा. नंतर गॅसवर एक पालेतं ठेवून त्यात दोन ग्लास पाणी टाका. त्यात शेंगा, लसणाच्या कळ्या आणि आलं टाका. सगळ्या गोष्टी चांगल्या उकडू द्या.

नंतर या सगळ्या गोष्टी एका चमच्याच्या मदतीनं बारीक करा. नंतर हे तयार झालेलं मिश्रण एका चाळणीतून गाळून वेगळ्या भांड्यात काढा. त्यानंतर एका कढईमध्ये बटर टाका आणि त्याला लसणाचा तडका द्या. त्यात हळद, अर्धा चमचा काळी मिरी पूड टाका आणि टेस्टनुसार मीठ घाला. वरून शेवग्याचं पाणी टाका. 5 ते 7 मिनिटं हे चांगलं गरम करा. आपलं शेवग्याचं सूप तयार आहे.

Web Title: Healthy and tasty drumstick soup, know its benefits and how to make this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.