>फूड > रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

Tea benefits and side effects : चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:22 PM2021-09-17T19:22:55+5:302021-09-17T19:39:02+5:30

Tea benefits and side effects : चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Health Tips : Tea benefits and side effects | रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

Next

सगळ्यांना सकाळी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अधिकाधिक लोक आपल्या सकाळची सुरूवात चहानं करतात. एक कप चहात २० ते ६० मिलिग्राम कॅफेन असते. कॅफेन हेल्थसाठी चांगले  ठरत नाही. म्हणून चहाच्या सेवनाबाबत काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.  

चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  चहा जास्त प्यायल्यानं हृदयाचे आजार वाढू शकतात. दिवसातून तीन ते चारवेळा चहा प्यायल्यानं एंटीबायोटीक औषधांचा परिणाम कमी होतो. म्हणून कोणत्याही आजारावरील औषध सुरू असतील तर चहा घेणं टाळा.

आतड्यांवर वाईट परिणाम

चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं आतड्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

लठ्ठपणा वाढू शकतो

चहा सतत प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या सुद्धा उद्भवते. कारण दुधातील फॅट्स आणि साखर या पदार्थांचा आहारात जास्त समावेश असल्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय सतत चहा प्यायल्यामुळे दात पिवळट दिसू लागतात. त्यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. म्हणून दिवसातून जास्त चहा पिणं टाळा.

सकाळी चहाचं सेवन कितपत योग्य?

सकाळी चहाचं सेवन करण्याची सवय सगळ्यांनाच असते. पण सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने एसिडीटीची समस्या उद्भवू शकते. भूक मरते, मेटाबोलिझ्मही मंदावतं. म्हणून उठल्यानंतर आधी गरम पाण्याचं सेवन करा. म्हणजे तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यानंतर नाष्त्याला काही पौष्टीक पदार्थ खाल्यानंतर चहाचं सेवन करा.

'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

रात्रभर शरीराला पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी तुम्ही चहा प्याल तर डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी रिकाम्या पोटी 2 ग्लास पाणी प्या. एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा चहा पित असाल, तर तुमची भूक मरते, कारण यामध्ये कॅफिने भरपूर प्रमाणात असतं.शिवाय तुमची ऊर्जाही कमी होते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा

चहा जास्त उकळून प्यायल्यानेही चहातील निकोटिनामाइडचं प्रमाण वाढतं, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. भरपूर वेळ आधी बनवलेला चहा तुम्ही पुन्हा गरम करून पित असाल, तर असा चहा विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे ताजा चहा प्या. तयार केल्यानंतर चहा पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.

जर तुम्ही चहा दीर्घकाळ म्हणजेच सुमारे 4 तास तसाच ठेवला. तर या काळात अनेक जीवाणू आणि जंतू चहामध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चहा गरम केलात, तर ते केवळ चव बदलत नाही. तर चहात असलेले सर्व फायदेशीर पोषक बाहेर फेकले जातात.

बहुतेक  लोक दुधाच्या चहाचे सेवन करतात. ज्यामध्ये सूक्ष्मजीव लवकर विकसित होण्याचा धोका असतो. जर तुम्ही गरम हर्बल चहा पित असाल तर त्याच्या आत असलेले सर्व गुणधर्म नाहिसे होतात. म्हणून चहा पहिल्यांदा बनवल्यानंतर लगेच  प्या.

Web Title: Health Tips : Tea benefits and side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

दुपारचीच पोळीभाजी रात्री नको, मग टेस्टी फ्रँकी करा!टेस्ट बेस्ट आणि स्वयंपाकाला आराम - Marathi News | Dont want lunch items for dinner, then make it tasty franky! Taste best and relax for cooking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारचीच पोळीभाजी रात्री नको, मग टेस्टी फ्रँकी करा!टेस्ट बेस्ट आणि स्वयंपाकाला आराम

दुपारचीच पोळी भाजी रात्री खायचा कंटाळा आला, तर हा घ्या हटके पर्याय, अन्नही वाया जाणार नाही आणि मुलंही खूश ...

How to make dal khichdi : हिवाळ्यात गरमागरम 'हॉटेल स्टाईल दाल खिचडी' नक्की ट्राय करा; ही घ्या चविष्ट, चवदार रेसेपी - Marathi News | How to make dal khichdi :  Perfect Dal khichdi recipe in marathi easy cooking tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात गरमागरम 'हॉटेल स्टाईल दाल खिचडी' नक्की ट्राय करा; ही घ्या चविष्ट, चवदार रेसेपी

How to make dal khichdi Food Tips : दाल खिचडीत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा तुम्ही समावेश करू शकतात. ज्यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. याशिवाय हा हलका फुलका आहार तुम्ही भाजी बनवलेली नसेल तरी पापड, लोणच्यासह पोटभर खाऊ शकता. ...

कुळीथ म्हणून नाक मुरडू नका, महागडे सुपरफूड होण्यापूर्वी मस्त खा कुळथाचं पिठलं! थंडीत आरोग्यासाठी वरदान - Marathi News | Don't ignore if it is kulith, eat cool kultha flour before it becomes an expensive superfood! Best food for health in cold weather | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुळीथ म्हणून नाक मुरडू नका, महागडे सुपरफूड होण्यापूर्वी मस्त खा कुळथाचं पिठलं! थंडीत आरोग्यासाठी वरदान

थंडीच्या दिवसांत गरमागरम कुळथाचं पिठलं, भाकरी किंवा भात म्हणजे सुख...आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त कुळीथाचे महत्त्व वेळीच जाणा ...

Crack Heels Solution :  थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? 'या' ३ सोप्या उपायांनी भेगा निघून टाचा होतील मऊ - Marathi News | Crack Heels Solution : Home made remedy for cracked heels How to Fix Cracked Heels at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेगा पडलेल्या टांचाचा त्रास झटपट होईल दूर; मऊ, वेदनारहीत पायांसाठी 'हा' घ्या सोपा उपाय

Crack Heels Solution Winter Care Tips : थंड हवामान, दीर्घकाळ उभे राहणे, अस्वस्थ्य आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, जमिनीवरील बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात. ...

करा चिझी ब्रेड पिझ्झा, फक्त १० मिनिटांत! ही घ्या चटपटीत रेसिपी, द्या स्वतःला टेस्टी ट्रीट - Marathi News | Make Cheesy Bread Pizza in Just 10 Minutes! Take this spicy recipe, give yourself a tasty treat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करा चिझी ब्रेड पिझ्झा, फक्त १० मिनिटांत! ही घ्या चटपटीत रेसिपी, द्या स्वतःला टेस्टी ट्रीट

कधी कधी खूप काहीतरी यम्मी खावं वाटतं.. असं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर हा चिझी ब्रेड पिझ्झा करून बघा. असे मस्त छोटे छोटे पिझ्झा खाऊन मुलेही खुश होऊन जातील. ...

Is it necessary to take bath daily : रोज अंघोळ करणं कितपत गरजेचं? थंडीत अंघोळीचा कंटाळा येत असेल तर हा रिसर्च नक्की वाचा - Marathi News | Is it necessary to take bath daily : Is it necessary to take bath every day know what reaserch says  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज अंघोळ करणं गरजेचं असतं? थंडीत अंघोळीचा कंटाळा येत असेल तर हा रिसर्च नक्की वाचा

Is it necessary to take bath daily : एका अहवालात असे म्हटले आहे की केवळ 60% लोक दररोज अंघोळ करतात. याशिवाय इतर लोक रोज आंघोळ करत नाहीत. ...