Join us  

Health Tips : अळूवड्या खाल्ल्यानं फर्टिलिटी वाढण्यासह मेंदूलाही होईल फायदा; तज्ज्ञांनी सांगितले अळूवड्यांचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:59 AM

Health Tips : अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते.अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्त्रोत आहेत. 

ठळक मुद्दे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाल्ले जाऊ शकते. कोफ्ताप्रमाणेच तुम्ही अळूच्या पानांच्या भज्या बनवून ग्रेेव्ही तयार करू शकता. करीना कपूरच्या आहारतज्ञांच्या मते, अळू वडीच्या सेवनाने आतडे आणि मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. जे लोक या दोन समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांना ही स्वादिष्ट डिश घरी बनवल्यास चवीबरोबरच इतर फायदेही मिळू शकतात.

(Image Credit-Cooking Carnival, sanjanafeasts)

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट डायटिशिनय रुजूता दिवेकर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आरोग्यासंबंधी टिप्स देतात. कधी डायबिटीस, कधी अनियमित मासिक पाळी तर कधी वजन कमी करण्यासाठी रुजूता महत्वाच्या गोष्टी शेअर करतात.  आरोग्यविषयक टिप्स व्यतिरिक्त,  देशाच्या अशा अनेक पारंपारिक पदार्थांबद्दल देखील सांगतात. रुजूता यांनी अलीकडेच  सोशल अकाऊंटवर एक खास डिशची एक पोस्ट शेअर केली आहे जी अळूवडी म्हणून ओळखली जाते.

यावेळी त्यांनी अळूवड्यांच्या सेवनानं शरीराला कसे फायदे मिळतात याबाबत सांगितले आहे.पोस्टच्या मथळ्यामध्ये अळूवडीबद्दल माहिती देताना त्यांनी लिहिले, 'या आहाराचे इंग्रजीमध्ये भाषांतर नाही पण पौष्टीक आहे आणि इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये ज्ञात आहे.  पोषक आणि चवीनं समृद्ध अळूवडीचे अनेक  फायदे देखील आहेत. 

मेंदूसह आतड्यांसाठी अळूवडी फायदेशीर

करीना कपूरच्या आहारतज्ञांच्या मते, अळू वडीच्या सेवनाने आतडे आणि मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. जे लोक या दोन समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांना ही स्वादिष्ट डिश घरी बनवल्यास चवीबरोबरच इतर फायदेही मिळू शकतात. अळूवडी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. अळूवडीच्या सेवनामुळे तुमच्या केसांना पोषण मिळते. प्रजनन क्षमता वाढवण्याचे गुणधर्मही अलूवडीमध्येही आढळतात. रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

मुख्यतः अळूवडी हा गुजरात आणि महाराष्ट्रात खाल्ला जाणारा प्रमुख पदार्थ आहे. जो चवदार आणि आरोग्यदायी आहे. गुजरातमध्ये याला पात्रा आणि महाराष्ट्रात आळूवडी म्हणून ओळखले जाते.  सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाल्ले जाऊ शकते. कोफ्ताप्रमाणेच तुम्ही अळूच्या पानांच्या भज्या बनवून ग्रेेव्ही तयार करू शकता. 

अळूवड्याच्या सेवनाचे इतर फायदे

अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते.अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी यांचा मोठा स्त्रोत आहेत. 

नजर चांगली होण्यासाठी आळूच्या पानांपासून बनविलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पचनासंबंधीचे विविध विकार, सांधेदुखी दुर करण्यासाठी आळूची भाजी किंवा वड्या खाव्यात.

अळूच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अळू आवर्जून खावा.अळूची पाने आणि कंद यामध्ये असणाऱ्या पदार्थांमुळे कशाचीही ॲलर्जी होत नाही. त्यामुळे आजारी माणसांनाही अळू खाण्याचा सल्ला दिला जातो. 'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

अळूवड्या तयार करण्याची  पद्धत

साहित्य

शिरा काढून टाकलेली अळूची पाने, चिंचेचा कोळ, गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने- जिरे पावडर, आलं- लसून पेस्ट, कोथिंबीर, बेसन 

कृती

सगळ्यात आधी तुम्हाला जेवढ्या वड्या करायच्या आहेत, तेवढे पीठ घ्या. पिठामध्ये वरील सर्व मिश्रण टाका आणि पाणी टाकून पीठ भजे करताना भिजवतो, तसे सैलसर भिजवून घ्या. 

भिजवलेले पीठ थोडे हातावर घ्या आणि एका ताटावर पसरवा. या पीठावर अळूचे पान पसरवा व पानावरून पुन्हा पिठाचा हात फिरवा.

आता एका टोकाने सुरूवात करून अळूचे पान तळहाताने गोल- गोल फिरवत त्याचा रोल करा. अशा पद्धतीने सगळी पाने केली, की ती वाफेवर चांगली शिजवून घ्या. नंतर त्याचे तुम्हाला आवडतील त्याप्रमाणात बारीक काप करा आणि या वड्या तळून घ्या. वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय केल्या तरी चालतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सअन्नआरोग्य