मसालेभात हा एक लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. घरोघरी वेवेगळ्या प्रकारे केला जातो. करायला सोपा असतो. तसेच चवीला एकदम भारी असतो. (Have you ever eaten spicy green pulav? A very simple recipe, tastes great, must try)पोटभरीचा होतो, तसेच सोबत कोशिंबीर, लोणचे, रायता असे पदार्थ सोबत घ्यायचे. कढी असेल तर मजाच येईल. अगदी सोपा आणि मस्त असा बेत नक्की करुन पाहा.
साहित्य 
बासमती तांदूळ, पाणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा, सुकं खोबरं, तेल, लसूण, आलं, जिरे, मोहरी, तमालपत्र, कडीपत्ता, हळद, मीठ, गरम मसाला, लिंबू, हिरवी मिरची, तूप
कृती
१. बासमती तांदूळ अगदी स्वच्छ धुवायचा. थोडावेळ पाण्यात ठेवायचा. नंतर पाणी काढून टाकायचे. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. तसेच टोमॅटोही बारीक चिरायचा. बटाटा सोलून घ्या. त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. 
२. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. त्यात हिरवी मिरची घालायची. थोडी कोथिंबीर घालायची. सुकं खोबरं सुरीला अडकवायचे आणि गॅसवर भाजून घ्यायचे. जरा जळायचे म्हणजे स्मोकी चव येते. सुकं खोबरंही मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात पाणी न घालता. ते वाटून घ्यायचे.
३. एका कढईत किंवा खोलगट भांड्यात चमचाभर तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची आणि मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे , तमालपत्र घालायचे. कडीपत्याची पाने घालायची आणि परतून घ्यायची. हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. कांदा घाला आणि परतून घ्या. बटाटाही परतायचा. मग टोमॅटोचे तुकडे घाला. तसेच चमचाभर हळद घाला. चमचाभर गरम मसाला घाला. चवीपुरते मीठ घाला आणि तयार केलेले वाटण घाला, ढवळून घ्या. पाणी घाला आणि एक उकळी काढा. मग भात घाला आणि ढवळून घ्या. झाकण ठेवा आणि भात शिजू द्या. नंतर वरतून तूप ओतायचे.



