एक तर पौष्टिक खाता येते नाहीतर चविष्ट असे जर वाटत असेल तर ते अगदीच चुकीचे आहे. पौष्टिक पदार्थही चविष्ट असू शकतात. अशा अनेक रेसिपी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ही सोयाबीनच्या टिकीची रेसिपी. (Great taste but not junk food, nutritious but not tasteless, make soyabean tikkis - delicious and quick)करायला अगदी सोपी आहे तसेच कमी कष्टात होते. पोटभर खा कारण पचायला हलकी आहे आणि प्रोटीनने परिपूर्ण आहे. पाहा कशी करायची.
साहित्य सोयाबिन, हिरवी मिरची, लसूण, आलं, गाजर, सिमला मिरची, कांदा, बेसन, मीठ, हळद ,लाल तिखट, तेल, पाणी, बीट, फ्लावर, गरम मसाला
कृती१. एका खोलगट भांड्यात सोयाबीन घ्यायचे. त्यात गरम पाणी ओतायचे. पाण्यात सोयाबीन किमान दहा मिनिटे ठेवायचे. ते मऊ होते. मग हाताने पिळून पाणी काढायचे. सोयाबीन एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. जाडसर वाटून घ्यायचे.
२. एका पातेल्यात पाणी गरम करायचे. त्यात सोललेले गाजर घालायचे. तुकडे करुन घाला. तसेच तुकडे केलेला फ्लावर घाला. चिरलेली सिमला मिरची घालायची आणि बीटाचे तुकडेही घालायचे. त्यात थोडे मीठ घालायचे आणि भाज्या उकळून घ्यायच्या. छान शिजू द्यायच्या. शिजल्यावर गार करायच्या. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. त्यात आल्याचा तुकडा घालायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घालायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मिक्सरमधून भाज्या वाटून घ्यायच्या. छान पेस्ट तयार करायची.
३. सोयाबीनमध्ये ही भाज्यांची पेस्ट घालायची. त्यात चमचाभर मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच थोडा गरम मसाला घालायचा आणि थोडे बेसनही घालायचे. मिश्रण छान एकजीव करुन घ्यायचे. नंतर त्याच्या टिक्की तयार करायच्या. जर फारच मऊ वाटत असेल तर त्यात थोडे बेसन जास्त घालायचे.
४. एका तव्याला तेल लावायचे. तवा जरा छान तापल्यावर त्यावर टिक्की लावायच्या. एका बाजूनी मस्त परतल्यावर दुसऱ्या बाजूनेही छान परतून घ्या. छान कुरकुरीत आणि खमंग परतायचे. भाज्या आणि इतरही आधीच शिजलेले असल्याने जास्त वेळ लागत नाही. वरतून चिरलेला कांदा घ्यायचा. सोबत छान लागतो.
Web Summary : Enjoy healthy and tasty soybean tikkis! This easy recipe combines soybean with vegetables like carrots, cauliflower, and beetroot. Mix with spices and besan, shape into tikkis, and pan-fry until golden brown. A protein-packed, guilt-free treat ready in minutes.
Web Summary : स्वस्थ और स्वादिष्ट सोयाबीन टिक्की का आनंद लें! यह आसान रेसिपी सोयाबीन को गाजर, फूलगोभी और चुकंदर जैसी सब्जियों के साथ मिलाती है। मसालों और बेसन के साथ मिलाएं, टिक्की का आकार दें और सुनहरा भूरा होने तक पैन-फ्राई करें। मिनटों में प्रोटीन से भरपूर, अपराध-मुक्त नाश्ता तैयार।