Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात मस्त गरमागरम सूप तो बनता है! पाहा पौष्टिक सूपची झटपट रेसिपी

पावसाळ्यात मस्त गरमागरम सूप तो बनता है! पाहा पौष्टिक सूपची झटपट रेसिपी

great hot soup during monsoon feels good! Check out this quick recipe for nutritious soup : पावसाळ्यासाठी खास रेसिपी. चमचमीत आणि गरमागरम सूप नक्कीच प्यायला हवे. पाहा कसे करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 19:27 IST2025-06-23T19:25:43+5:302025-06-23T19:27:28+5:30

great hot soup during monsoon feels good! Check out this quick recipe for nutritious soup : पावसाळ्यासाठी खास रेसिपी. चमचमीत आणि गरमागरम सूप नक्कीच प्यायला हवे. पाहा कसे करायचे.

great hot soup during monsoon feels good! Check out this quick recipe for nutritious soup | पावसाळ्यात मस्त गरमागरम सूप तो बनता है! पाहा पौष्टिक सूपची झटपट रेसिपी

पावसाळ्यात मस्त गरमागरम सूप तो बनता है! पाहा पौष्टिक सूपची झटपट रेसिपी

पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मज्जाच काही वेगळी आहे. सूप हा प्रकार पावसाळ्यात आणि हिवाळ्यात घरोघरी केला जातोच. (great hot soup during monsoon feels good! Check out this quick recipe for nutritious soup )अनेक प्रकारचे सूप करता येते. एकदा ही रेसिपीही करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे आणि पौष्टिकही आहे. लहान मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे सूप.   

साहित्य 
बीट, गाजर, टोमॅटो, काळीमिरी, काळीमिरी पूड, जिरे पूड, धणे पूड, आलं, लसूण, कांदा, मीठ, हिरवी मिरची, तेल, लोणी  

कृती
१. बीट सोलून घ्यायचे. तसेच गाजरही सोलून घ्यायचे. टोमॅटोचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. तसेच आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी छान पेस्ट तयार करायची. मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. किंवा ठेचून घेतले तरी चालेल. 

२. एका कुकरच्या भांड्यात बीटाचे तुकडे घ्यायचे. त्यात गाजराचे तुकडे घालायचे. तसेच टोमॅटोचे तुकडेही घालायचे. चमचाभर मीठ घालायचे. पाणी घालायचे आणि मग कुकर लावायचा. सगळे पदार्थ छान शिजतील एवढे शिजवायचे. नंतर कुकर उघडायचा आणि पदार्थ गार करायचे. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात बीटाचे तुकडे घ्यायचे. टोमॅटो घ्यायचा तसेच गाजराचे तुकडे घ्यायचे त्यात काळीमिरी घालायची आणि थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे. छान पातळ करायचे. जास्त घट्ट ठेवायचे नाही. सगळे मस्त वाटले जाील याची काळजी घ्यायची. 

४. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेलावर आले-लसूण पेस्ट घालायची आणि परतायची. पेस्ट छान परतल्यावर त्यात तयार केलेले मिश्रण त्यात ओतायचे. छान परतायचे. त्यात पाणी ओतायचे आणि सूप तयार करायचे. त्यात उकळी आल्यावर काळीमिरी पूड घालायची. तसेच जिरे पूड घाला. धणे पूड घाला आणि छान ढवळा. गरजे पुरते मीठ घालायचे आणि छान सूप उकळायचे. 

५. सूप तयार झाल्यावर गरमागरम प्यायला घ्यायचे. त्यात चमचाभर लोणी घालायचे. मस्त चविष्ट सूप पावसाळ्यात प्यायला नक्कीच मज्जा येईल.     

Web Title: great hot soup during monsoon feels good! Check out this quick recipe for nutritious soup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.