खजूर पान हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. याची चव गोडसर तर असते पण त्यात साखर नसते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तो आवडतो. खजूर पानात भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फायबर आणि नैसर्गिक साखर असते. हे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते आणि थकवा दूर करते. तसेच करायलाही अगदी सोपे आहे.पचनासाठी खजूर पान खूप चांगले मानले जाते. यातील नैसर्गिक घटक पोटासाठी सौम्य असतात आणि पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता कमी करतात. (Good for digestion and very tasty - see the recipe for making date bites, eat one every day after meals)सकाळी किंवा दुपारी खजूर पान खाल्ल्यास पोट हलके वाटते तसेच हा पदार्थ आरामदायक ठरतो. त्यातील इतर पदार्थ जसे की बडीशेप आणि धणे तसेच गुलकंद खजूरामुळे निर्माण होणारी उष्णता कमी करुन खजूर पान संतुलित करतात.
जेवणानंतर फक्त बडीशेप खायचा कंटाळा आला असेल तर हे पान करुन ठेवा. करायला वेळ लागत नाही चवीला एकदम मस्त असते. नक्की करुन पाहा.
साहित्य खजूर, बडीशेप, विड्याचे पान, डेसिकेटेड कोकोनट, धणे डाळ, गुलकंद
कृती१. खजूर स्वच्छ धुवायचे आणि मग त्याला सुरीने बारीक चिर मारायची. आतील बिया काढून घ्यायच्या. खजूर मध्येच तुटेल एवढी चिर मारु नका.
२. एका पॅनमध्ये थोडी बडीशेप घ्या. त्यात धणे पूड घाला. तसेच डेसिकेटेड कोकोनट घाला. सारे पदार्थ मस्त भाजून घ्या. डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुकं खोबरं घ्या किसा किसल्यावर थोडं वाळवा आणि ते वापरा. विड्याच्या पानाचे तुकडे करुन घ्या. बारीक आणि पातळ करायचे. कात्रीने करा. म्हणजे छान होतात. विड्याची पाने जरा वाळवून घ्या. किंवा भाजून घ्या.
३. सारे पदार्थ गार करायचे. मग एका परातीत घ्या आणि त्यात दोन चमचे गुलकंद घाला. हाताने मिश्रण छान कालवून घ्यायचे. खजूरात भरायचे आणि मग खजूर थोडा वेळ सेट होऊ द्यायचा.
Web Summary : Date bites are a tasty, healthy treat, naturally sweet and rich in iron, calcium, and fiber. Easy to make, they aid digestion, relieve bloating, and provide energy. Combining dates with fennel, coriander, and gulkand creates a balanced, flavorful, post-meal delight.
Web Summary : खजूर बाइट्स एक स्वादिष्ट, स्वास्थ्यवर्धक व्यंजन है, जो स्वाभाविक रूप से मीठा और आयरन, कैल्शियम और फाइबर से भरपूर है। बनाने में आसान, वे पाचन में सहायता करते हैं, सूजन से राहत देते हैं और ऊर्जा प्रदान करते हैं। सौंफ, धनिया और गुलकंद के साथ खजूर का संयोजन भोजन के बाद एक संतुलित, स्वादिष्ट आनंद है।