Join us

गोकुळाष्टमी स्पेशल : कान्हाला आवडतो तसा परफेक्ट गोपाळकाला करा ५ मिनिटांत, पारंपरिक सुंदर पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 17:18 IST

Gokulashtami Special: Make the perfect Gopalkala just like Kanha likes in 5 minutes, traditional dish, Indian recipes : गोकुळआष्टमी स्पेशल पदार्थ नक्की करा. पाहा गोपाळकाला करायची रेसिपी.

गोकुळाष्टमी हा सण म्हणजे दुग्धजन्य पदार्थांची चंगळच असते. दुधाची मिठाई तर आपण खातोच मात्र दही, दूध, ताक आणि लोणी या पदार्थांच्या अनेक रेसिपी केल्या जातात. रोजच्यापेक्षा दोन वाट्या दही जास्त लावले जाते. (Gokulashtami Special: Make the perfect Gopalkala just like Kanha likes in 5 minutes, traditional dish, Indian recipes )दही फक्त खायलाच नाही तर दह्यात माखून सगळे आनंदाने सण साजरा करतात. या दिवशी काही खास पदार्थ केले जातात. त्यापैकी एक म्हणजे दहीकाला. ज्याला गोपाळकाला असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी फक्त काला असे म्हणतात. हा पदार्थ अगदी साधा आहे. पोह्यांचा हा पदार्थ कृष्णाच्या आवडीचा मानला जातो. त्यामुळे अष्टमीच्या प्रसादासाठी करतात. पाहा काला करायची सोपी पद्धत. 

साहित्यपोहे, दही, काकडी, हिरवी मिरची, नारळ, कोथिंबीर, डाळिंब, तूप, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, शेंगदाणे , मीठ, साखर 

कृती१. शेंगदाणे भिजवायचे. थोडा वेळ भिजवले तरी ते जरा मऊ होतात. त्याची चव वेगळी लागते. ताजी कोथिंबीर आणा आणि व्यवस्थित निवडून घ्या. धुतल्यावर बारीक चिरुन घ्या. डाळिंब सोलून घ्या. छान गोडसर दाणे काढून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. बारीक तुकडे करुन घ्या. 

२. ताजा नारळ घ्या. नारळ फोडून घ्या आणि खरवडून घ्या. गोडसर काकडी घ्या. काकडी सोलून घेतली की बारीक चिरा. पोहे स्वच्छ धुवायचे. थोडावेळ पाणी निथळू द्यायचे. नंतर एका खोलगट भांड्यात पोहे घ्यायचे. त्यात काकडीचे तुकडे घालायचे. तसेच त्यात हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. चिरलेली कोथिंबीर घाला आणि मग डाळिंबाचे दाणे त्यात घाला. भिजवलेले शेंगदाणे त्यात घाला. सारे पदार्थ एकत्र करुन घ्या. मग त्यात चवी पुरते मीठ घाला दोन चमचे साखर घाला. शेवटी दही घाला आणि कालवून घ्या. जेवढे पोहे घ्याल तेवढेच दही घ्यायचे. दह्यात पोहे मुरु द्यायचे.  

३. एका फोडणी पात्रात चमचाभर तूप घ्यायचे. तूप तापल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच चमचाभर जिरं घाला. हिंग घाला आणि फोडणी छान खमंग करुन घ्या. नंतर ती फोडणी काल्यावर ओता आणि ढवळून घ्या. थोडावेळ झाकून ठेवा. काला जास्त सुका झाला तर थोडे दही घाला. 

टॅग्स :जन्माष्टमीअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स