ऑक्टोबर हिटचे दिवस संपून आता हळुहळु वातावरणात गारठा पडू लागला आहे. या गुलाबी थंडीच्या वातावरणात गरमागरम वाफाळता चहा पिण्याचे सुख काही औरच असते. त्यातही या गरमागरम चहात आलं (Dried ginger tea: A soothing and nourishing beverage for cold winter days) घातलेलं असेल तर त्या चहाची चव ही अधिक चविष्ट लागते. थंडी (Is ginger tea good in winter?) सुरु झाली की सगळ्यांनाच हा गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. चहा बनवताना तो अधिक स्वादिष्ट व्हावा यासाठी आपण त्यात आलं, तुळशीची पाने, वेलची, चहा मसाला असे अनेक जिन्नस घालतो(Why is ginger tea important in winter).
चहामध्ये आलं (Ginger is your best friend this winter season; know the health benefits of this root) घातल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्रोत म्हणून आलं ओळखलं जात. त्याचबरोबर मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, कॅल्शियम, बीटा कॅरेटिन मुबलक प्रमाणात असतात. याचबरोबर आल्यात अँटिफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणांत असतात. आल्याचा आहारात समावेश करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करता येतात. परंतु असे असले तरीही चहासोबत आल्याचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरते. आल्याचा चहा पिणे (Sip Some Ginger To Stay Warm This Winter) हे आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याच्या गुणधर्मामुळे ते अनेक आजारांपासून आपले संरक्षण करू शकते. हिवाळ्यात आल्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि ते बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया( 10 Benefits of Drinking Ginger Tea in Winter).
हिवाळ्यांत आल्याचा चहा पिण्याचे फायदे :- (10 Benefits Of Ginger Tea In Winter)
१. आल्यामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, घशात कफ यासारख्या समस्या सर्रास होत असतात. अशा परिस्थितीत आल्याचा चहा आपल्याला या समस्यांपासून आराम देऊ शकतो.
२. आल्याचा चहा पचनासाठीही चांगला असतो.
३. जर आपला घसा खवखवत असेल तर आल्याचा चहा जरूर प्यावा.
४. आलं हे नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते आणि अन्न पचण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी आता चक्क केळी खा ! 'मॉर्निंग बनाना डाएट' चा अनोखा ट्रेंड...
उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...
५. आल्याचा चहा वजन कमी करण्यासाठी देखील चांगला मानला जातो.
६. आल्याचा चहा हिवाळ्यात अनेक मौसमी आजारांपासूनही आपले रक्षण करतो.
७. आल्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि झिंक देखील असते.
८. आलं हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून आपले संरक्षण करते.
९. सांधेदुखी सारख्या आजारांवर आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
१०. आल्याचा गंध आणि इतर औषधी गुणधर्मांमुळे मेंदूच कार्य सुरळीत सुरु राहण्यास मदत होते, यामुळे ताण - तणाव दूर होण्यास मदत मिळते.
दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...
यंदा गुलाबी थंडीत करा मसालेदार खट्टामिठा पेरु चाट, तोंडाला पाणी सुटेल - घ्या झटपट रेसिपी...
आल्याचा चहा बनवण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ?
१. हिवाळ्यात आल्याचा चहा बनवताना आपण दूध, पाणी आणि चहा पावडर यासोबतच लवंग, दालचिनी, वेलची इतरही काही गोष्टी वापरू शकतो.
२. आल्याच्या चहामध्ये तुळस आणि दालचिनीचा १ छोटा तुकडा घातल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
३. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर फॅट फ्री दुधात हा चहा बनवा आणि त्यात कमीत कमी साखर घालावी.
४. रात्री झोपताना चुकूनही आल्याचा चहा पिऊ नका यामुळे कदाचित झोप येणे कठीण होईल.