lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

Worried about weight gain during the festive season ? Try these fitness tips : सणाच्या निमित्ताने रोज हेव्ही, मसालेदार, गोड पदार्थ खाऊन तब्येत तर बिघडते, पण वजन वाढीची समस्याही सतावते, असे होऊ नये म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 09:15 AM2023-11-01T09:15:00+5:302023-11-02T06:32:46+5:30

Worried about weight gain during the festive season ? Try these fitness tips : सणाच्या निमित्ताने रोज हेव्ही, मसालेदार, गोड पदार्थ खाऊन तब्येत तर बिघडते, पण वजन वाढीची समस्याही सतावते, असे होऊ नये म्हणून...

Tips to avoid weight gain during festive season, How to keep your weight in check during festive season | दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

सध्या वातावरणात सगळीकडेच सणवाराचा उत्साह भरभरुन दिसत आहे. दिवाळी सणासाठी सगळ्यांची जय्यत तयारी सुरु करण्याची लगबग प्रत्येक घरात पहायला मिळत आहे. भारतीय कुठलाही सण म्हटला की तो विशेष खाद्यपदार्थ किंवा पक्वानाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आपल्याकडे प्रत्येक सणानुसार काहीतरी विशेष पदार्थ बनवण्याची पारंपरिक प्रथा आहे. दिवाळी हा सण फराळाशिवाय अधूराच म्हणावा लागेल. दिवाळीच्या फराळात आपण अनेक गोड, तिखट पदार्थ आवर्जून बनवतो. याचबरोबर दिवाळीत एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून घरी जाताना काहीतरी गोडाधोडाचे पदार्थ घेऊन जातोच(How do you maintain weight during festive season?).

सणासुदीच्या निमित्ताने असे अनेक पदार्थ खाण्याचा आनंद आणि सुख हे काही वेगळेच असते. परंतु असे गोड, मसालेदार, तेलकट पदार्थ खाताना आपल्याला तब्येतीची काळजी (Tips to avoid weight gain during festive season) घेणं देखील गरजेचे असते. सणावाराच्या निमित्ताने असे पदार्थ हे आपल्याला क्वचितच खायला मिळत असले तरीही ते खाण्याचे प्रमाण हे योग्य असावे. जर आपण वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर पोट बिघडण्याची किंवा वजन वाढण्याची (Tips to Control Weight Gain During The Festive Season) चिंताही आपल्याला सतावू लागते. बरेचदा सणासुदीच्या काळात (6 ways to avoid festive season weight gain) असे पदार्थ खाऊन आपले पोट बिघडते, हेच वजन वाढीचे मुख्य कारण असते. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या  गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुदीप खन्ना यांनी सणांच्या काळात काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या टिप्सच्या मदतीने सणावारा दरम्यान आपली पचनक्रिया बरोबर राहील व आपण कोणतीही काळजी न करता चवदार मिठाई आणि जेवणाचा आस्वाद घेऊ शकाल(How to keep your weight in check during festive season).

सणावारा दरम्यान वजन वाढू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ? 

१. माईंडफूल ईटिंग :- सणावाराच्या निमित्ताने काहीही खाताना नेहमी माईंडफूल इटिंगकडे अधिक लक्ष द्यावे. सण - उत्सवांमुळे खाण्याच्या सवयींमध्ये गडबड होणे हे सर्रास घडते. जेव्हा आपण घाई - घाईत जेवतो तेव्हा आपल्या पोटाला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचबरोबर घाई - गडबडीत कधीही काहीही खाताना आपले पोट हे कायम खाण्यासाठी तयार असेलच असे नसते. असे असल्यामुळे आपल्याला अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून, अन्न हळूहळू खाणे आणि व्यवस्थित चावून खाणे महत्वाचे आहे.

२. बॅलेन्स आहार घ्यावा :- सण - उत्सवांमुळे आपल्याला अनेकदा गोड, मसालेदार, तेलकट असे पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. परंतु असे पदार्थ सतत खाणे हे पोट व आरोग्यासाठी योग्य नाही. असे पदार्थ खायचे असतील तर आरोग्यदायी पर्यायांसोबतच पोटही संतुलित ठेवलं पाहिजे. अशावेळी फळे, कडधान्ये, ताज्या भाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. या पौष्टिक पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होत नाही. 

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

३. भरपूर पाणी प्यावे :- या दिवसांत भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरांतील टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. पाण्यांसोबतच आपण हर्बल ग्रीन टी किंवा हेल्दी सूप प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीराला हायड्रेशन मिळते.

तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

४. पोर्शन कंट्रोल :- खाताना आपण जे काही पदार्थ खात आहोत त्याच्या पोर्शन कंट्रोल कडे लक्ष देणे गरजेचे असते. थोड्या थोड्या वेळाने लहान स्मॉल मिल घेतल्याने शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यास मदत होते. खाण्याचे क्रेविंग्स होत आहेत म्हणून किंवा केवळ पोट भरण्यासाठी म्हणून खाऊ नका. 

कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

५. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी :- सण - उत्सवात जेवढे लक्ष खाण्याकडे असते तेवढेच लक्ष फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करण्याकडेही द्यावे. यामुळे आपले पोट निरोगी राहते आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. शारीरिक हालचाली वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते याचबरोबर खाल्ल्यानंतर फिरायला विसरू नका.

६. स्ट्रेस घेऊ नका :- या काळात पोट बिघडल्यास एक प्रकारचा स्ट्रेस आपल्या मनावर येतो. या स्ट्रेसमुळे विचित्र वाटत राहते, कामात मन लागत नाही. अशा गोष्टींमुळे मनावर ताण येऊन सणासुदीचा नीट आनंद घेता येत नाही. यासोबत अशा काळात स्ट्रेस घेणे हे वजन वाढीचे मुख्य कारण असू शकते. त्यामुळे अशावेळी स्ट्रेस घेऊ नका. या दिवसांत आहारासोबतच डिप ब्रीदिंग व योगा करण्यावर जास्त भर द्यावा.

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

Web Title: Tips to avoid weight gain during festive season, How to keep your weight in check during festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.