Lokmat Sakhi >Food > लसूणी काजू-ही भाजी खाल्ली की नाही? सगळ्या शाही भाज्यांना मागे टाकेल अशी हटके रेसिपी

लसूणी काजू-ही भाजी खाल्ली की नाही? सगळ्या शाही भाज्यांना मागे टाकेल अशी हटके रेसिपी

Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe : काजूची ही अशी भाजी नक्की करा. चवीला जामच मस्त करायलाही सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 17:37 IST2025-05-29T17:35:09+5:302025-05-29T17:37:27+5:30

Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe : काजूची ही अशी भाजी नक्की करा. चवीला जामच मस्त करायलाही सोपी.

Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe | लसूणी काजू-ही भाजी खाल्ली की नाही? सगळ्या शाही भाज्यांना मागे टाकेल अशी हटके रेसिपी

लसूणी काजू-ही भाजी खाल्ली की नाही? सगळ्या शाही भाज्यांना मागे टाकेल अशी हटके रेसिपी

घरी असलेल्या साध्या काजूची भाजी चवीला फारच मस्त असते. करायला सोपी आहे.(Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe) एकदा तरी नक्कीच करुन पाहा. बाकी शाही भाज्यांना मागे टाकेल ही चमचमीत काजूची भाजी. 

साहित्य 
काजू, तूप, लसूण, कांदा, तमालपत्र, आलं, कोथिंबीर, जिरं, कसुरी मेथी, गरम मसाला, साय, पाणी, हिंग, लाल मिरची, टोमॅटो, हळद, लाल तिखट  

कृती
१. एका कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे. तुपावर काजू परतून घ्यायचे. काजू अख्खा घेऊ नका तुकडे करायचे. किंवा दोन भाग करायचे. (Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe)तुपावर काजू मस्त परतून घ्यायचे. छान लाल परतायचे. काजू परतून झाल्यावर लसूण परतायची. लसणाचेही तुकडे करायचे लसूण छान पिवळट परतायची. काजू व लसूण परतून झाल्यवार बाजूला ठेवा. 

२. त्याच कढईत आणखी चमचाभर तूप घाला आणि मग त्यात तमालपत्र घाला. हिंग घाला आणि जिरं घाला. छान परता मग त्यात किसलेले आले घालायचे आणि लाल मिरचीचे दोन तुकडे घालायचे. लाल मिरची जास्त घालू नका. त्यात अगदी छान बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा मस्त गुलाबी होईपर्यत परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटोची पेस्ट घालायची. टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी मिक्सरमध्ये टोमॅटोचे तुकडे घालायचे आणि ते व्यवस्थित वाटून घ्यायचे. बाकी काही त्यात घालू नका. 

२. कांदा व टोमॅटो मस्त परतल्यावर त्यात गरम मसाला घालायचा. तसेच हळद घालायची आणि लाल तिखटही घालायचे. चवी पुरते मीठ घाला आणि सगळं छान ढवळून घ्या. त्यात थोडे पाणी घालायचे. पाणी जास्त घालू नका. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळे पदार्थ मस्त ढवळायचे. त्यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. भाजी उकळल्यावर त्यात परतलेला लसूण घालायचा आणि मग परतलेले काजू घालायचे. व्यवस्थित ढवळायचे गरज असेल तर पाणी घाला. भाजी जरा घट्ट झाली की त्यात ताज्या दुधाची साय घालायची. हातावर थोडी कसुरी मेथी मळायची आणि त्यात घालायची. गॅस बंद करा आणि ढवळून घ्या.        

Web Title: Garlic Cashew curry - Have you tried this or not? A unique recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.