lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Ganesh Chaturthi 2021: प्रसादाचे लाडू, मोदक खाल्ल्यानं होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2021: प्रसादाचे लाडू, मोदक खाल्ल्यानं होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2021: मोदक बाप्पाच्या आवडीचे म्हणून घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. पण खूप लोक या दिवसातही लाडू, मोदक खाणं टाळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 12:04 PM2021-09-12T12:04:53+5:302021-09-12T12:15:01+5:30

Ganesh Chaturthi 2021: मोदक बाप्पाच्या आवडीचे म्हणून घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. पण खूप लोक या दिवसातही लाडू, मोदक खाणं टाळतात.

Ganesh Chaturthi 2021: Health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it | Ganesh Chaturthi 2021: प्रसादाचे लाडू, मोदक खाल्ल्यानं होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2021: प्रसादाचे लाडू, मोदक खाल्ल्यानं होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल; डॉक्टरांनी सांगितलं कारण

गणेश चतुर्थीचा सण संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.  काहीजण दीड दिवस, काही पाच दिवस, तर काहीजण १० दिवस बाप्पाची सेवा करतात. या दिवसात मोदक, लाडू यांसारख्या नैवेद्यांच्या पदार्थांचे खूप महत्व असते. मोदक बाप्पाच्या आवडीचे म्हणून घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. पण खूप लोक या दिवसातही लाडू, मोदक खाणं टाळतात.

मोदक खाल्ल्यानं आपलं वजन वाढेल, शुगर लेव्हल वाढेल याची भिती त्यांच्या मनात असते.  अनेक आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ज्ञ लाडूचा नैवेद्य खाण्याची शिफारस करतात. प्रख्यात आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी आधीच लोकांना  मोदक खाण्यास सांगितले आहे आणि दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांना लाडू खाण्यास सांगितले आहे. अलीकडेच डॉक्टर सुचिता भानुशाली यांनीही लाडूच्या वापराबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ.सुचिता भानुशाली यांनी लाडू बनवण्याची एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लिहिले आहे की, 'लाडू हा लहानपणापासून माझ्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे, गणेश चतुर्थी उत्सवातील हा महत्वाचा गोड  गोड पदार्थ आहे. म्हणून मी लाडूचा समावेश माझ्या नाश्त्यात करते. हे स्पष्ट आहे  की आहारात लाडू घेण्यामध्ये काहीच नुकसान नाही, असे डॉक्टरांचे विधान आहे, म्हणजेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत गणपतीचा नैवेद्य खाण्यास नकार देऊ नये.'

  

डॉक्टर भानुशाली पुढे पोस्टमध्ये लिहितात, 'जर तुम्ही लाडू खाणे टाळत असाल तर ते तुमच्या शरीराला मदत करणार नाही. हे स्पष्ट आहे की एक लाडू खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी होणार नाही, म्हणून प्रसादाचे आनंदाने सेवन  करा.'

हाडं चांगली राहतात

ही मिष्टान्न इतर जेवणांसह खाल्ल्याने तुमच्या एकूण आहार योजनेत पोषक घटक जोडले जातील.  लाडू हाडांच्या  टिश्यूजना बळकट करतात आणि त्यांना आवश्यक पोषण देतात, कारण ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के आणि प्रथिने समृद्ध असतात.

आरोग्यासाठी फायदेशीर

लाडूमध्ये असलेले पोषक घटक मेंदूपासून प्रतिरक्षा प्रणालीपर्यंत शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतात. ते उष्णता निर्माण करणारे अन्नपदार्थ आहेत, म्हणून ते तापमानात घट झाल्यावर शरीराला अंतर्गत उष्णता तयार करतात. ते सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. परंतु हे लक्षात ठेवा की लाडू आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात जेव्हा तुम्ही ते स्वतःच्या हातांनी बनवता आणि कमी प्रमाणात लाडूंचे सेवन करता.

Web Title: Ganesh Chaturthi 2021: Health benefits of laddu doctor said bad news if you are avoiding it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.