Join us  

FSSAI Tips : तुम्हीसुद्धा भेसळयुक्त मटार आवडीनं खाताय? FSSAI नं सांगितलं बनावट वाटाणे कसे ओळखायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 1:10 PM

FSSAI Tips : या भेसळयुक्त खाद्यपदार्थांना ओळखण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विटरवर #Detectingfoodadulterants नावाचा उपक्रम सुरू केला आहे. 

सध्या आपण प्रगतीच्या त्या शिखरावर पोहोचलो आहोत जिथे मानवासाठी काहीही अशक्य नाही. खाद्यपदार्थांमध्येही असेच काहीसे घडले आहे. आधी जेथे लोक हंगामी फळे आणि भाज्या खात असत आणि हंगामी फळे आणि भाज्यांची वाट पाहत असत. पण त्याच वेळी आज तुम्हाला प्रत्येक हंगामात तुमच्या आवडीच्या भाज्या आणि फळे मिळतील. बाजारात नेहमी मिळत असलेल्या या भाज्यांवर कृत्रिम रंग आणि रसायने वापरली जातात. मटार पनीर, वाटाण्याची उसळ किंवा मॅगी, पुलावमध्ये घालण्यासाठी कोणत्याही ऋतूत वाटाणे घरोघरी वापरले जातात. अनेकजण आता फ्रोजन वाटाणे मोठ्या प्रमाणात वापरतात. 

या भेसळयुक्त खाद्यपदार्थांना ओळखण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विटरवर #Detectingfoodadulterants नावाचा उपक्रम सुरू केला आहे.  या उपक्रमात, प्रत्येक आठवड्यात इतर खाद्यपदार्थातील भेसळ तपासण्यासाठी एक ट्रिक शेअर केली जाते. या व्हिडीओत त्यांनी मटार भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्याची ही एक सोपी ट्रिक सांगितली आहे. 

सावधान! तरूण महिलांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ७ कारणं

बनावट भाज्या कशा ओळखायच्या?

आजच्या काळात बाजारात अनेक भेसळयुक्त खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. याआधी, एफएसएसएआयने हळद, हिरव्या पालेभाज्या, मीठ आणि इतर अनेक खाद्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी एक ट्रिक शेअर केली होती. FSSAI ने दिलेली ट्रिक इतकी सोपी आहे की अगदी लहान मूल सुद्धा करू शकते. अशीच एक ट्रिक आता एफएसएसएआयने मटारची चाचणी करण्यासाठी सांगितली आहे. याद्वारे तुम्हाला सहज समजेल की तुमचे मटार शुद्ध आहेत की भेसळयुक्त.

रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

भेसळयुक्त मटार कसे ओळखायचे?

सर्वप्रथम, काही मटार घ्या आणि त्यांना पारदर्शक काचेच्या ग्लासात आत ठेवा. आता त्यात पाणी घालून अर्धा तास सोडा. जर पाण्याचा रंग बदलला नाही तर मटार भेसळयुक्त नाहीत.  दुसरीकडे, जर ग्लासमध्ये ठेवलेले पाणी हिरवे झाले तर याचा अर्थ असा की तुमचे वाटाणे भेसळयुक्त आहेत. त्यांना खाणे हानिकारक असू शकते. घरी भेसळयुक्त वाटाणे तपासणे किती सोपे आहे हे तुम्ही पाहिले आहे. आता जर तुम्ही कधीही मटार आणले तर त्यांना नक्कीच असे तपासा. जर पाण्याचा रंग बदलला तर तसे वाटाणे वापरू नका. अलर्ट! फक्त छातीत दुखणं नाही तर 'ही' ३ लक्षणं आहेत हार्ट अटॅकचे संकेत; जाणून घ्या बचावाचे उपाय

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य