Join us

प्रोटीन मिळवण्यासाठी सकाळचा बेस्ट नाश्ता, 'या' पदार्थांमधूनही मिळेल भरपूर प्रोटीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:54 IST

Protein Rich Breakfast Food: सकाळच्या नाश्त्यात प्रोटीन खूप महत्वाचं असतं. अशात कशातून प्रोटीन मिळू शकतं, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Protein Rich Breakfast Food: सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सगळ्यात महत्वाच्या फूडपैकी एक असतो. कारण यानंच तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते. जर सकाळी नाश्ता केला नाही तर कमजोरी आणि थकवा जाणवतो. त्यामुळे सकाळचा नाश्ता न टाळण्याचा सल्ला एक्सपर्ट नेहमीत देत असतात. सोबतच तुम्ही सकाळी नाश्त्यात काय खाता हेही खूप महत्वाचं ठरतं. सकाळच्या नाश्त्यात प्रोटीन खूप महत्वाचं असतं. अशात अंडी सोडून कशातून प्रोटीन मिळू शकतं, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रोटीन शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. ज्यामुळे मसल्सची वाढ होते, तसंच पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. प्रोटीन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी खातात. मात्र, अनेकांना अशा पदार्थांबाबत माहीत नसतं ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तेच आज जाणून घेणार आहोत.

बेसनाचा पोळा

प्रोटीन भरपूर असलेल्या बेसनामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून तुम्ही बेसन पोळाही बनवू शकता. बेसनाचा पोळा तयार करायलाही जास्त वेळ लागत नाही आणि सकाळी नाश्त्यात याचं सेवन करू शकता.

मूग डाळीचा पोळा

केवळ बेसनच नाही तर मूग डाळीमध्येही भरपूर प्रोटीन असतं. मूग डाळ रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ती बारीक करून त्यात तिखट-मीठ, मसाले टाकून पोळा तयार करा. मूग डाळीच्या पोळ्याचं सेवन तुम्ही हिरव्या चटणीसोबतही करू शकता.

ओट्स पोहे

पोहे हा सगळ्यात पौष्टिक नाश्ता मानला जातो. पोह्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी यात ओट्स मिक्स करू शकता. तसेच तुमच्या आवडीच्या भाज्याही यात टाकू शकता. 

छोल्याचं सॅंडविच

वजन कमी करण्यासाठी छोल्याच्या सॅंडविच तयार करू शकता. तुम्ही छोल्यांचा म्हणजे चण्यांचा सलादही बनवू शकता. चण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. चणे बारीक करून सॅंडविच स्प्रेडही बनवू शकता.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआहार योजनाआरोग्य