lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Food Tips : रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

Food Tips : रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

Food Tips : भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे फोडणी देऊन डाळ तयार केली जाते. डाळीची फोडणी चांगली झाली असेल तर दोन घास जरा जास्तच जेवण जातं.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:59 PM2021-10-11T16:59:13+5:302021-10-11T17:15:21+5:30

Food Tips : भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे फोडणी देऊन डाळ तयार केली जाते. डाळीची फोडणी चांगली झाली असेल तर दोन घास जरा जास्तच जेवण जातं.  

Food Tips : 5 useful tips while making regular dal rice | Food Tips : रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

Food Tips : रोजचा डाळ भात अधिक चवदार, चविष्ट लागेल; फक्त 'या' ५ टिप्स वापरून फोडणी द्या

कितीही डाएट करायचं म्हटलं किंवा शुगर कंट्रोलसाठी भात नाही खाणार म्हटलं तरी भाताशिवाय जेवण जात नाही हेच खरं. अनेकांना कितीही पोटभर जेवलं तरी भात नसेल तर जेवल्यासारखं वाटत नाही. रोज सारख्या चवीचा डाळभात खाण्यापेक्षा डाळ बनवताना  काही बदल केले आणि लहान लहान टिप्स लक्षात ठेवल्या तर वरण भात  खाण्याची मजाच काही वेगळी असेल. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे फोडणी देऊन डाळ तयार केली जाते. डाळीची फोडणी चांगली झाली असेल तर दोन घास जरा जास्तच जेवण जातं.  रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील. 

१) फोडणी चविष्ट होण्यासाठी काय कराल?

१) नेहमी त्याच त्याच पद्धतीची फोडणी देण्यापेक्षा वेगळी पद्धत ट्राय करा. फोडणीत तुम्ही मोहोरी, जीरं घातल्यानंतर लसूण जाडसर वाटून घालू शकता. लसणाच्या फोडणीची डाळ चवीला अप्रतिम असते. 

२) फोडणी देताना तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचा वापर करू शकता. कधीतरी तेलाऐवी तुपाचा वापर डाळीची चव वाढवण्यासाठी चांगला पर्याय ठरेल.

३) फोडणीत कांदा,  कस्तुरी मेथी, हिंग घातल्यानंतही डाळीला उत्तम चव येते. 

२) भात गचगचीत होऊ नये म्हणून टिप्स

भातातील स्टार्च आणि आर्सेनिकसारखे हानीकारक तत्व काढून टाकण्यासाठी भात शिजवण्याताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

१) सगळ्यात आधी तांदूळ  ३ ते ४ वेळा पाण्यानं स्वच्छ धुवा. शिजवताना भांड्यावर झाकण ठेवणार नसाल तर त्यात सतत चमचा ढवळू नका. 

२) भात शिजायला ठेवल्यानंतर ३ ते ४ मिनिटांनी त्यातलं पाणी काढून घ्या. मग पुन्हा शिजायला ठेवा. 

३) तांदूळ शिजवताना २ ते ३ तीन थेंब तेला घाला. या तुमचा भात अधिक मोकळा होण्यास मदत होईल. 

नेहमीपेक्षा वेगळा भात व्हावा असं वाटत असेल तर तांदूळ स्वच्छ करून घ्या. नंतर 1 चमचा तूप घ्या आणि 2 लवंग त्यात भाजा. फक्त 1 मिनिट्स भाजून घ्या आणि त्यात धुतलेले तांदूळ घाला. त्यानंतर तुम्ही नियमित ज्याप्रमाणे तांदूळ शिजवता तसाच शिजवा. यामुळे तांदूळ लवकर शिजतो आणि याचा लवंगाच्या वापरानं भाताचा सुगंध छान येतो.

या पद्धतीनं तुम्ही जेव्हा भात शिजवाल तेव्हा जास्त पोषक तत्व मिळू शकतील. जे तुम्हाला घरगुती, पारंपारिक पद्धतीनं भात शिजवल्यास मिळणार नाहीत. या पद्धतीनं तांदूळ शिजवल्यानं त्यात माइक्रोन्यूट्रिएंट्स (micronutrients) तसेच राहू शकतात.  हा सगळ्यात सोपा आणि कमी वेळखाऊ उपाय आहे. 

भातात पाणी किती असावं 

भात चांगला शिजण्यासाठी तुम्ही पाण्याचं किती घेता हे महत्वाचं असतं. काहीजण भात करतान तांदळात पाणी मोजून मापून टाकत नाही आणि मग भात गचगचीत होतो. भात जर भांड्यात मोकळा शिजवणार असाल. तर एका वाटीला दोन वाट्या पाणी असं प्रमाण घ्यावं. आणि भात जर कुकरला लावणार असाल तर एका वाटीला दीड वाटी पाणी असं प्रमाण घ्यावं.

Web Title: Food Tips : 5 useful tips while making regular dal rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.