हिवाळ्याच्या दिवसांत डिंक खाण्याची परंपरा आपल्या देशात फार जुनी आहे. थंडीच्या काळात शरीराला जास्त उष्णता, ताकद आणि पोषणाची गरज असते, तेव्हा डिंक हे नैसर्गिकरित्या शरीराला बळ देणारे खाद्य मानले जाते. आयुर्वेदात डिंक उष्ण, स्निग्ध आणि बलवर्धक गुणांचा मानला जातो, त्यामुळे हिवाळ्यात तो विशेष फायदेशीर ठरतो.
डिंक खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यात वारंवार थंडी वाजते, अंग थंड पडते किंवा हात-पाय गार होतात अशी तक्रार असेल तर डिंक उपयोगी ठरतो. (Eating gond in winter is very important for health - Dinkwadi, a food that provides much-needed warmth to the body, is absolutely delicious)तो शरीरातील वात कमी करण्यास मदत करतो, म्हणूनच थंडीमुळे होणारी पाठदुखी, सांधेदुखी किंवा कंबरदुखी यावर डिंक फायदेशीर मानला जातो.
डिंक हा ताकद वाढवणारा पदार्थ आहे. आजारपणातून बरे झाल्यावर, प्रसूतीनंतर किंवा खूप थकवा जाणवत असताना डिंकाचे लाडू देण्याची पद्धत आहे. यामुळे स्नायू आणि हाडांना बळकटी मिळते, शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो.
साहित्य
तूप, डिंक, बदाम, काजू, खसखस, सुकं खोबरं, खारीक, गव्हाचे पीठ, गूळ, पाणी, वेलची पूड, जायफळ पूड
कृती
१. खारीक घ्यायची आणि बिया काढायच्या. नंतर एका पॅनमध्ये खारीक परतून घ्यायची. परतून झाल्यावर गार करायची आणि मग त्याची पूड करुन घ्यायची. काजू आणि बदामाचे तुकडे करायचे. अगदी पूड करायची नाही फक्त तुकडे करायचे. सुकं खोबरं घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं. सारे पदार्थ तुपावरच परतायचे. तेलाची चव चांगली लागणार नाही.
२. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. त्यात डिंक घालायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यात थोडे खसखस घालायचे. मग थोडे गव्हाचे पीठ घालून परतायचे. गव्हाचे पीठ छान खमंग परतून घ्यायचे. गूळ किसायचा. किसलेला गूळही त्या मिश्रणात घालायचा. चमचाभर वेलची पूड घालायची. तसेच चमचाभर जायफळ पूड घालायची. मिश्रण मस्त एकजीव करायचे.
३. त्यात थोडे काजू घालायचे. थोडे बदाम घालायचे. मिश्रण मिक्स करायचे. ढवळून घ्यायचे. थोडे पाणी घालायचे. पीठ जरा घट्टच ठेवायचे. जास्त पातळ करायचे नाही. सगळे पदार्थ छान एकजीव झाल्यावर ताटात लावायचे. जरा कोमट झाले की त्याच्या वड्या पाडायच्या.
