Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > थंडीत ‘हे’ ताजे फळ रोज न विसरता खा, डॉक्टर-ब्युटीशियनकडे जाण्याचे पैसे वाचतील भरपूर

थंडीत ‘हे’ ताजे फळ रोज न विसरता खा, डॉक्टर-ब्युटीशियनकडे जाण्याचे पैसे वाचतील भरपूर

Eat this fresh fruit every day in the cold season, many problems will be solved : हिवाळ्यात अगदी ताजे मिळणारे हे फळ ठेवेल पोट साफ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2025 18:30 IST2025-12-04T18:28:16+5:302025-12-04T18:30:30+5:30

Eat this fresh fruit every day in the cold season, many problems will be solved : हिवाळ्यात अगदी ताजे मिळणारे हे फळ ठेवेल पोट साफ.

Eat this fresh fruit every day in the cold season, many problems will be solved | थंडीत ‘हे’ ताजे फळ रोज न विसरता खा, डॉक्टर-ब्युटीशियनकडे जाण्याचे पैसे वाचतील भरपूर

थंडीत ‘हे’ ताजे फळ रोज न विसरता खा, डॉक्टर-ब्युटीशियनकडे जाण्याचे पैसे वाचतील भरपूर

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात ताजे, मऊ आणि रसाळ अंजीर मिळायला लागतात. हे फळ दिसायला साधे वाटले तरी त्यात आरोग्यासाठी अप्रतिम गुणधर्म दडलेले असतात. (Eat this fresh fruit every day in the cold season, many problems will be solved  )थंडीच्या दिवसांत अंजीर खाणे शरीराला उब, पोषण आणि ऊर्जा देणारे ठरते. त्यामुळे हे फळ हिवाळ्यात नक्की आहारात असावे, अंजीर खाणे नक्कीच फायद्याचे ठरते. तसेच चवीलाही हे फळ छान असते. त्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात. तसेच ते फळ छान मऊ असते, त्यामुळे वृद्धव्यक्तीही खाऊ शकतात. 

ताजे अंजीर पचनासाठी खूप हलके असते आणि त्यातील नैसर्गिक तंतुमयता पोट साफ ठेवते. थंडीत पचन थोडे मंद होते, जडपणा जाणवतो, बद्धकोष्ठता वाढते अशा वेळी अंजीर नियमित खाल्ल्यास पचन सुधारते आणि पोट सतत स्वच्छ राहते. अंजीरातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते, त्यामुळे थंड हवेत कमी होणारी ताकद परत मिळते. शरीरासाठी हे फळ नक्कीच पौष्टिक असते. त्यामुळे रोज एक अंजीर खाणे फायदेशीर आहे. 

पोषणाच्या दृष्टीने अंजीर हे अत्यंत समृद्ध फळ आहे. त्यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ही खनिजे हाडे मजबूत ठेवतात, रक्तातील हिमोग्लोबिन सुधारतात आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखतात. हिवाळ्यात स्नायूंवर सुज येते आणि ताण वाढण्याची समस्या वाढते, अंजीरातील पोटॅशियम यात मोठी मदत करते. त्यामुळे अंजीर फक्त पचनच नाही इतरही अनेक गोष्टी सुधारते. 

अंजीरात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला किंवा लहानमोठे इन्फेक्शन सहज होतात. अंजीरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्वचा कोरडी, फिकट आणि निस्तेज होण्याचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे, अंजीरातील सूजरोधक गुणधर्मामुळे त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी होतो.

हृदयासाठीही अंजीर अत्यंत चांगले मानले जाते. त्यातील तंतू रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते आणि हृदयावरचा ताण कमी होतो. थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हिवाळ्यात हृदयाला जास्त काम करावे लागते. अशा वेळी अंजीरासारखे पोषक आणि हलके फळ खाणे फायदेशीर ठरते. थोडक्यात, ताजे अंजीर हे हिवाळ्याच्या दिवसांत पोषण देणारे आहे. पचन, ऊर्जा, रोगप्रतिकारशक्ती, त्वचा आणि हृदय सर्व बाबतीत ते शरीराची योग्य काळजी घेतं. 

Web Title : सेहत के लिए सर्दियों में रोज ताजे अंजीर खाएं।

Web Summary : सर्दियों में अंजीर गर्मी, ऊर्जा और बेहतर पाचन प्रदान करते हैं। खनिजों और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, वे प्रतिरक्षा, हृदय स्वास्थ्य को बढ़ावा देते हैं और स्वस्थ त्वचा को बढ़ावा देते हैं। रोजाना एक अंजीर जरूरी पोषक तत्व प्रदान करता है।

Web Title : Eat fresh figs daily in winter for health benefits.

Web Summary : Figs offer warmth, energy, and improved digestion during winter. Rich in minerals and antioxidants, they boost immunity, and heart health, and promote healthy skin. A daily fig provides essential nutrients.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.