Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > जिभेवर विरघळणारा मऊ रेशमी पराठा खा, पराठ्याचा वेगळाच प्रकार- चव मात्र जबरदस्त

जिभेवर विरघळणारा मऊ रेशमी पराठा खा, पराठ्याचा वेगळाच प्रकार- चव मात्र जबरदस्त

Eat soft, silky paratha that melts in mouth, a different kind of paratha - the taste is amazing : चविष्ट असा हा रेशमी सिल्क पराठा एकदा नक्की करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 15:53 IST2026-04-06T15:50:37+5:302026-04-06T15:53:23+5:30

Eat soft, silky paratha that melts in mouth, a different kind of paratha - the taste is amazing : चविष्ट असा हा रेशमी सिल्क पराठा एकदा नक्की करा.

Eat soft, silk paratha that melts in mouth, a different kind of paratha - the taste is amazing | जिभेवर विरघळणारा मऊ रेशमी पराठा खा, पराठ्याचा वेगळाच प्रकार- चव मात्र जबरदस्त

जिभेवर विरघळणारा मऊ रेशमी पराठा खा, पराठ्याचा वेगळाच प्रकार- चव मात्र जबरदस्त

रेशमी पराठा हा नावाप्रमाणेच मऊ, हलका आणि मस्त टेक्स्चर असलेला पराठ्याचा एक खास प्रकार आहे. रेशमी म्हणजेच सिल्की अशी दोन नावे आहेत. आणि हा पराठा खातानाही त्याची चव तशीच मस्त लागते. पारंपरिक पराठ्यांपेक्षा हा अधिक सॉफ्ट, लवचिक आणि जिभेवर विरघळणारा असतो. रेशमी पराठ्याची खासियत म्हणजे तो फारच मऊ असतो. (Eat soft, silk paratha that melts in mouth, a different kind of paratha - the taste is amazing)हा पराठा बनवताना पीठ अतिशय मऊ भिजवलं जातं आणि त्यात तेल किंवा तूप वापरून ते थोडावेळ ठेवलं जातं. त्यामुळे पराठा शिजल्यानंतर तो खूपच हलका आणि लेयर्ड (layered) दिसतो. त्याचा पोत इतका मऊ असतो की तो हाताने सहज तोडता येतो आणि खाताना कोणताही कडकपणा जाणवत नाही.

हा पराठा प्रामुख्याने उत्तर भारतीय किंवा पंजाबी खाद्यसंस्कृतीत पाहायला मिळतो. विशेषतः रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह होणाऱ्या ग्रेव्ही पदार्थांसोबत जसे की पनीर, किंवा इतर रस्सा भाजी आदींसोबत रेशमी पराठा खूप छान लागतो. त्याचा मऊपणा मसालेदार भाजीसोबत उत्तम जुळून येतो. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य 
बटाटा, मैदा,  कोथिंबीर, पाणी, हिरवी मिरची, जिरे, चिलीफ्लेक्स, मीठ, तेल, तूप 

कृती
१. बटाटे उकडून घ्यायचे. गार करायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. ताजी कोथिंबीर घ्यायची आणि निवडायची. मस्त बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. मस्त बारीक चिरायची. 

२. बटाटा किसायचा. किसल्यामुळे तो मस्त मऊ होतो. त्यामुळे किसणे गरजेचे आहे. किसून झाल्यावर त्यात थोडा मैदा घालायचा. तसेच थोडे जिरे घालायचे. थोडे चिलीफ्लेक्स घालायचे आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घालायचे. थोडं तेल घाला आणि पीठ मळून घ्यायचं. त्यात कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून मळून घ्यायचे. त्याला तेल लावायचे आणि तासभर झाकून ठेवायचे. 

३. पीठ छान सेट होते. मग थोडा सुका मैदा लावायचा आणि पातळ पराठा लाटून घ्यायचा. छान पातळ लाटा. सगळीकडून समान लाटायचा. तवा गरम करायचा त्याला तूप लावायचे आणि तुपावर मस्तपैकी पराठा परतून घ्यायचा. दोन्ही बाजूंनी छान खमंग परतायचा.  

Web Title : मुँह में घुल जाने वाला रेशमी पराठा: एक अनोखा, स्वादिष्ट व्यंजन।

Web Summary : रेशमी पराठा, एक मुलायम, परतदार भारतीय रोटी, मुँह में घुल जाने वाला अनुभव कराती है। यह उत्तर भारतीय व्यंजन, पारंपरिक पराठों से नरम, ग्रेवी के साथ बहुत अच्छा लगता है। नरम आटा गूंथकर, घी लगाकर और सुनहरा होने तक पकाने की विधि।

Web Title : Melt-in-your-mouth silk paratha: A unique, flavorful flatbread recipe.

Web Summary : Reshmi paratha, a soft, layered Indian flatbread, offers a melt-in-your-mouth experience. This North Indian delight, softer than traditional parathas, pairs perfectly with gravies. The recipe involves kneading a soft dough, layering with ghee, and cooking until golden.