Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूगडाळ कटलेट एकदा खा, पुन्हा पुन्हा कराल! भरपूर भाज्या घालून करा पौष्टिक पदार्थ झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 14:22 IST

Eat moongdal cutlets once, you'll make it again and again! a nutritious meal, healthy food : मूगडाळीचे चविष्ट कटलेट करा घरीच. झटपट रेसिपी.

चवीला मस्त असे पदार्थ खायची सारखी इच्छा होते तर विविध रेसिपी करुन पाहा ज्या पौष्टिकही आहेत आणि करायला सोप्याही. जसे की हे मूगडाळीचे कटलेट अगदी सोपे आहे मात्र चव एकदम भारी. एकदा केले की पुन्हा नक्की कराल. (Eat moongdal cutlets once, you'll make it again and again! a nutritious meal, healthy food )शिवाय लहान मुलांनाही आवडते, पाहा रेसिपी. 

साहित्य मूगडाळ, हिरवी मिरची, आलं, तेल, पांढरे तीळ, कांदा, मटार, लसूण, पाणी, दुधी भोपळा, गाजर, सिमला मिरची, रवा, दही, मीठ, जिरे, लाल तिखट, हळद, मोहरी 

कृती१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. मूगडाळ रात्रभर भिजवायची. किमान ४ तास तरी भिजलेली हवीच. एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेली मूगडाळ लसणाच्या काही पाकळ्या आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि वाटून त्याची पेस्ट तयार करायची. 

२. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. मटारचे दाणे सोलून घ्यायचे. दुधी भोपळा सोलून घ्यायचा आणि मस्त किसून घ्यायचा. सिमला मिरची बारीक चिरुन घ्यायची. गाजर सोलायचे आणि किसून घ्यायचे. 

३. तयार केलेली मूगडाळीची पेस्ट एका वाडग्यात घ्यायची. त्यात कांदा घालायचा, सिमला मिरची घालायची. तसेच दुधी भोपळाही घालायचा. गाजर घालायचे मटारचे दाणे घालायचे. वाटीभर रवा घालायचा. तेवढेच दही घालायचे. लाल तिखट घालायचे आणि थोडी हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे आणि मिश्रण एकजीव करायचे. 

४. हाताने मिक्स करायचे. जरा घट्टच ठेवायचे. अगदी पातळ होऊ द्यायचे नाही. पॅनला तेल लावायचे. तळण्यासाठी घेता तेवढे नाही मात्र जरा नेहमीपेक्षा जास्त तेल घ्या. त्यात मोहरी घाला आणि जिरे घाला. पांढरे तीळही जरा परतून घ्यायचे.  तडतडले की तयार मिश्रण गोलाकार आकारात ओता. चमच्याच्या मदतीने लहान कटलेटच्या आकाराचे मिश्रण पॅनवर लावायचे. दोन्ही बाजूंनी खमंग परतून घ्यायचे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Moong Dal Cutlet Recipe: Healthy, Delicious, and Easy to Make!

Web Summary : Make delicious and nutritious moong dal cutlets easily! This simple recipe, packed with vegetables like carrots and peas, creates a tasty, healthy snack perfect for kids and adults. Fry to golden perfection.
टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स