चंदन बटवा ही एक पारंपरिक रानभाजी आहे. रानभाज्या सगळीकडेच पटकन मिळत नाहीत. मात्र चंदन बटवा तसा सगळीकडेच मिळतो. कमी प्रसिद्ध असलेली ही भाजी फारच पौष्टिक असते. साध्या मसाल्यांत शिजवली तरी तिची चव खूप छान लागते आणि शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. (Eat authentic Marathi flavoured Chandan Batwa Bhaji, great for increasing blood flow - women must eat it! See the traditional recipe)ग्रामीण भागात आवर्जून केली जाणारी ही भाजी आजच्या धावपळीच्या जीवनात पुन्हा आहारात घ्यायला हवी, इतकी ती गुणकारी आहे.
चंदन बटव्यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तवाढीस मदत होते आणि अशक्तपणा कमी होण्यास उपयोग होतो. यामधील फायबर पचन सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते आणि पोट दीर्घकाळ हलके ठेवते. चंदनबटवा शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा पचन बिघडलेले असताना ही भाजी विशेष फायदेशीर ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिक ताकद देण्यासाठीही या भाजीचा उपयोग होतो.
ही भाजी करायला अगदीच सोपी आहे. चंदनबटवा नीट निवडून त्याची पाने आणि कोवळी देठं वेगळी करुन स्वच्छ धुवून घ्यावीत. मोठे देठ थोडे बारीक चिरावे. कढईत थोडे तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे आणि चिमूटभर हिंग घाला. फोडणी छान तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. लसूण घालू शकता. अगदी सोप्या पद्धतीने करता येते. चवीला मस्त लागते.
चंदनबटव्याची भाजी शक्यतो भाकरी सोबत मस्त खाल्ली जाते. तसेच मेथीची पोळी आणि पराठ्यासोबतही छान लागते. शिवाय चपाती किंवा भातासोबतही छान लागते. लहान मुलांना देताना ती थोडी जास्त मऊ शिजवून आणि कमी तिखट करावी. चव, पोषण आणि पारंपरिक चव असलेली चंदनबटवा भाजी नियमित आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य टिकून राहण्यास नक्कीच मदत होते. ही रानभाजी चवीला मेथी, पालक सारखीच लागते. कडू किंवा तुरट वगैरे चव येत नाही. छान चव असते, त्यामुळे नक्की करा.
Web Summary : Chandan Batwa, a nutritious leafy vegetable, boosts blood flow and reduces weakness. Rich in iron, calcium, and fiber, it aids digestion and balances body heat. Easy to cook with simple spices, it's a healthy, traditional dish, especially beneficial for women.
Web Summary : चंदन बटवा, एक पौष्टिक पत्तेदार सब्जी, रक्त प्रवाह को बढ़ाती है और कमजोरी को कम करती है। आयरन, कैल्शियम और फाइबर से भरपूर, यह पाचन में मदद करता है और शरीर की गर्मी को संतुलित करता है। सरल मसालों के साथ पकाने में आसान, यह एक स्वस्थ, पारंपरिक व्यंजन है, जो विशेष रूप से महिलाओं के लिए फायदेमंद है।