Join us

हिवाळ्यात रोज खा एक पौष्टिक लाडू, लहान मुले मागून खातील चविष्ट ड्रायफ्रुट्स लाडू, दहा मिनिटांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2025 13:47 IST

Eat a nutritious laddu every day in winter, delicious dry fruit laddus that kids will love : पौष्टिक लाडू करायची सोपी पद्धत.

हिवाळा असो वा सणासुदीचा काळ शरीराला उब देणारे आणि ताकद वाढवणारे पदार्थ सर्वांनीच खायला हवे. अशा वेळी ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक लाडू हा एक उत्तम, चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो. अनेक प्रकाचे लाडू केले जातात. (Eat a nutritious laddu every day in winter, delicious dry fruit laddus that kids will love)मात्र लाडू पौष्टिक नाही तर भरपूर साखर असलेले अनहेल्दी पदार्थ आहे. घरी केलेले काही लाडूचे प्रकार मात्र आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे लाडू फक्त स्वादिष्टच नाहीत तर शरीराला आवश्यक प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि नैसर्गिक ऊर्जा देतात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे ड्रायफ्रुट्सचे लाडू. 

साहित्य बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, खारीक, खजूर, मनुका, तूप, खसखस, तीळ

 कृती१. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्या. त्यावर बदाम परतून घ्यायचे. नंतर तेवढ्याच प्रमाणात काजू परतायचे. थोडे पिस्ते परतायचे आणि मग अक्रोडही परतून घ्यायचे. खारीक आणि खजूराच्या बिया काढून घ्यायच्या. दोन्ही पदार्थ परतायचे. 

२. खसखसही जरा परता, मनुका हलक्या परता तीळही हलके परता. सारे पदार्थ गार करा आणि मग एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. खजूर फक्त वेगळा वाटायचा. त्याची चिकट पेस्ट होते. बाकी पदार्थ एकत्र छान वाटून घ्या. एका परातीत पूड काढून घ्या. त्यात चार ते पाच चमचे गरम तूप ओता. पीठ मळा आणि त्यात खजूराची पेस्ट घाला. एकत्र करा आणि लाडू वळून घ्या. 

या लाडूंमध्ये साखर अजिबात लागत नाही, कारण खजूर आणि खारीक नैसर्गिक गोडवा देतात. त्यामुळे हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहेत. दररोज एक लाडू खलल्यास शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. ड्रायफ्रूट्स लाडू हे हिवाळ्यातील परिपूर्ण सुपरफूड मानले जातात. कारण ते शरीराला उब देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्वचा तसेच केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.थोडक्यात सांगायचं तर, हे लाडू म्हणजे स्वाद, आरोग्य आणि पारंपरिक असे सुंदर मिश्रण आहेत. सणासुदीला गोडाचा आनंद घ्यायचा आणि शरीरालाही फायदा व्हावा असं वाटत असेल, तर हे पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडू नक्की करा. एकदा खाल्ले की पुन्हा खावेसे वाटतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy dry fruit laddu recipe for winter energy and immunity.

Web Summary : Enjoy homemade dry fruit laddus, a nutritious winter treat. These laddus provide energy, boost immunity, and are delicious for all ages, using dates and dried fruits for natural sweetness.
टॅग्स :दिवाळी २०२५हिवाळ्यातला आहारआहार योजनाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स