कणकेची खीर हा साधा पण अतिशय पौष्टिक भारतीय पदार्थ आहे. घरात पटकन होणारा आणि पचायला हलका असल्यामुळे हा पदार्थ पिढ्यान्पिढ्या आवडीने खाल्ला जातो. चवीला छान, सुगंधी आणि पोटभरीची ही खीर पोषणाच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे. (Eat a bowl of healthy kheer every day, a 10-minute recipe is a power tonic for women and children )साध्या गव्हाच्या कणकेत शरीराला आवश्यक अनेक पोषकतत्त्वे असतात, त्यामुळे दैनंदिन आहारात तिचा समावेश केला तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कणकेत फायबर, प्रथिने, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि काही महत्त्वाचे अँटी ऑक्सिडंट्स असतात. खीर घेतल्यावर हे पोषक घटक शरीराला अधिक सहज पचतात. फायबरमुळे पोटाची हालचाल नियमित राहते, पचनक्रिया संतुलित राहते. बी-व्हिटॅमिन्स ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात, तर लोह रक्तातील हिमोग्लोबिन योग्य ठेवते. मॅग्नेशियम आणि झिंक शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात.
महिलांसाठी कणकेची खीर तर विशेष फायदेशीर मानली जाते. सर्वप्रथम, कणकेत असलेल्या लोहामुळे रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते, जी महिलांमध्ये सामान्य समस्या असते. दुसरे म्हणजे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतात, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी जाणवतो. रिकव्हरीसाठी, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी किंवा मासिक पाळीदरम्यान अशक्तपणा येतो त्यावर कणकेची खीर सौम्य पण पोषक आहार म्हणून उत्तम ठरते.
साहित्य कणीक, दूध, काजू, बदाम, तूप, साखर
कृती१. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्यायचे. त्यावर कणीक परतायची, छान खमंग परतून घ्यायची. बदामाचे आणि काजूचे तुकडे करायचे. ते ही तुपावर परतून घ्यायचे. कणीक परतून झाल्यावर त्यात गरम दूध ओतायचे.
२. दूध जरा आटेपर्यंत ढवळायचे. कणकेच्या थोड्या गुठळ्या राहिल्या तरी चालते त्याची चव जास्त छान लागते. त्यात साखर घालायची. साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालते. फक्त गूळ किसून घ्यायचा. ढवळायचे आणि छान शिजू द्यायचे.
Web Summary : Wheat flour kheer is a simple, nutritious Indian dish, rich in fiber, protein, and essential nutrients. It aids digestion, boosts energy, and helps prevent anemia, especially beneficial for women and children. The recipe involves roasting wheat flour in ghee, adding milk, nuts, and sweetener.
Web Summary : गेहूं के आटे की खीर एक सरल, पौष्टिक भारतीय व्यंजन है, जो फाइबर, प्रोटीन और आवश्यक पोषक तत्वों से भरपूर है। यह पाचन में मदद करता है, ऊर्जा बढ़ाता है, और एनीमिया को रोकने में मदद करता है, खासकर महिलाओं और बच्चों के लिए फायदेमंद है। बनाने के लिए, आटे को घी में भूनें, दूध, मेवा और मिठास मिलाएं।