Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताज्या रसरशीत आवळ्याचा रस ‘असा’ ठेवा फ्रिजमध्ये-रोज प्या आणि चिरतरुण राहा आयुष्यभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 17:14 IST

Drinking Amla juice is must in summers, good for health and light on stomach : आरोग्यासाठी फार चांगला ठरतो आवळ्याचा रस. पाहा कसा प्यावा.

सगळ्या चवी आहारात असाव्यात, कारण आरोग्यासाठी त्या गरजेच्या असतात. तुरट चवीचा आवळा खाताना जरी दात आम्ले तरी तो फार पौष्टिक आहे. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. विशेषतः त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप उपयुक्त ठरतो. (Drinking Amla juice is must in summers, good for health and light on stomach )रोज ताजा आवळा मिळेलच असं नाही, त्यामुळे एकदाच आवळ्याचा रस तयार करून साठवून ठेवला तर तो दीर्घकाळ वापरता येतो आणि आरोग्याची काळजी घेणं सोपं होतं. 

आवळ्याचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम ताजे आणि स्वच्छ आवळे घ्या. ते नीट धुऊन घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करा. बी काढून टाका. आता हे तुकडे मिक्सरमध्ये टाका आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार झालेली पेस्ट स्वच्छ कापड किंवा गाळणीतून गाळून रस वेगळा करा. हा शुद्ध आवळ्याचा रस एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडंसं मीठ किंवा लिंबाचा रस घालू शकता. अशा प्रकारे तयार केलेला रस महिनाभर सहज टिकतो.

रोज हा रस पिताना एक-दोन चमचे आवळ्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून घ्या. आवडीनुसार थोडासा मध घालू शकता. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचे फायदे अधिक चांगले मिळतात. आवळ्याचा रस नियमित पिण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. आवळ्यात व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे सर्दी-खोकला आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळतं. तसेच, हा रस पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो आणि अॅसिडिटी कमी करतो.

त्वचेसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तो शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते. केसांसाठीही आवळ्याचा रस उपयुक्त ठरतो. केस गळणे कमी होते, केस मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होणे यासाठी तो मदत करतो. याशिवाय, आवळ्याचा रस शरीराला ऊर्जा देतो आणि थकवा कमी करतो. नियमित सेवन केल्यास डोळ्यांच्या आरोग्यासाठीही तो फायदेशीर ठरतो. रक्त शुद्ध ठेवण्यास मदत होते आणि एकूणच शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Preserve fresh Amla juice, drink daily for youthful, healthy life.

Web Summary : Amla juice boosts immunity, aids digestion, and enhances skin and hair health. Prepare fresh juice, store it in the fridge with salt or lemon, and consume daily for optimal benefits.
टॅग्स :समर स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना