Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सकाळी झटपट पटापट प्या बदामशेक, मुलांसह आईसाठी पोटभरीचा पदार्थ! ताकद वाढेल पण वजन वाढणार नाही..

सकाळी झटपट पटापट प्या बदामशेक, मुलांसह आईसाठी पोटभरीचा पदार्थ! ताकद वाढेल पण वजन वाढणार नाही..

Drink almond shake, it is a filling food for mothers and children! It will increase strength but will not increase weight : मस्त चविष्ट बदामशेक करायची सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 14:31 IST2026-01-19T14:26:53+5:302026-01-19T14:31:17+5:30

Drink almond shake, it is a filling food for mothers and children! It will increase strength but will not increase weight : मस्त चविष्ट बदामशेक करायची सोपी रेसिपी.

Drink almond shake, it is a filling food for mothers and children! It will increase strength but will not increase weight | सकाळी झटपट पटापट प्या बदामशेक, मुलांसह आईसाठी पोटभरीचा पदार्थ! ताकद वाढेल पण वजन वाढणार नाही..

सकाळी झटपट पटापट प्या बदामशेक, मुलांसह आईसाठी पोटभरीचा पदार्थ! ताकद वाढेल पण वजन वाढणार नाही..

विविध प्रकारची थंड पेयं आपण आवडीने पितो. त्यापैकी एक म्हणजे बदाम शेक. थंडगार आणि गोड असा हा बदामशेक बाजारात मिळतोच. मात्र तो बदामाचा असला तरी आरोग्यासाठी चांगला नाही. त्यात भरमसाठ साखर असते. मात्र काही बदल करुन घरी केलेला बदाम शेक हा केवळ चविष्टच नाही तर अतिशय पौष्टिक असा प्रकारही ठरु शकतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तो आरोग्यदायी आहे. शरीराला ऊर्जा देणारा, मेंदूला चालना देणारा आणि स्नायूंना बळकटी देणारा असा बदाम शेक आहारात नियमित घेतल्यास अनेक फायदे मिळतात. (Drink almond shake,   it is a filling food for mothers and children! It will increase strength but will not increase weight)बदाम शेकमध्ये मुख्यत्वे प्लांट-बेस्ड प्रोटीन असते, जे बदामातून मिळते. बदामातील प्रोटीन स्नायू मजबूत करण्यास, थकवा कमी करण्यास आणि शरीराची दुरुस्ती प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. यासोबतच दूध घातल्यामुळे शेकमध्ये दुधातील पूर्ण प्रोटीन कॅसिन आणि व्हे प्रोटीन मिसळले जाते. त्यामुळे हा शेक शरीरासाठी उत्तम प्रोटीनचा स्रोत ठरतो.

पोषणमूल्यांच्या दृष्टीने बदाम शेक खूप समृद्ध असतो. बदामात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यात चांगले फॅट्स, फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमही असते. दूध कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी देते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. खजूर नैसर्गिक गोडी देतो आणि आयर्न, पोटॅशियम व ऊर्जा पुरवतो. वेलची पूड पचन सुधारते आणि शेकला छान सुगंध व चव देते. बदाम शेकची सोपी आणि पौष्टिक रेसिपी जाणून घ्या आणि नक्की करुन पाहा. 

साहित्य 
बदाम, दूध, वेलची पूड, खजूर  

कृती
१. ५ ते ६ बदाम रात्री पाण्यात भिजत घाला. सकाळी त्यांची साल काढून घ्या. १ ते २ खजूर बिया काढून घ्या. मिक्सरमध्ये भिजवलेले बदाम, खजूर आणि १ ग्लास उकळून थंड केलेले दूध घ्या. चव आणि सुगंधासाठी चिमूटभर वेलची पूड घाला. सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्या. मस्त शेक तयार करायचा. जास्त घट्ट वाटल्यास थोडे दूध घालता येते.

हा बदाम शेक थंड किंवा साधाही घेता येतो. साखर घालण्याची गरज नसते कारण खजूर नैसर्गिक गोडी देतो. नियमित आणि मर्यादित प्रमाणात बदाम शेक घेतल्यास शरीराला पोषण, ऊर्जा आणि चांगले आरोग्य नक्कीच मिळते.

Web Title : झटपट बादाम शेक रेसिपी: स्वस्थ, पौष्टिक और ऊर्जा बढ़ाने वाला पेय।

Web Summary : घर का बना बादाम शेक बाजार के विकल्पों की तुलना में पौष्टिक है। बादाम, दूध और खजूर से भरपूर प्रोटीन, विटामिन और खनिजों से भरपूर, यह ऊर्जा प्रदान करता है, मांसपेशियों को मजबूत करता है और सभी उम्र के लिए समग्र स्वास्थ्य को बढ़ावा देता है। भीगे हुए बादाम, खजूर, दूध और इलायची का उपयोग करके एक सरल नुस्खा एक स्वादिष्ट और स्वस्थ पेय प्रदान करता है।

Web Title : Quick almond shake recipe: Healthy, filling, and energy-boosting drink.

Web Summary : Homemade almond shake is a nutritious alternative to store-bought versions. Rich in protein, vitamins, and minerals from almonds, milk, and dates, it provides energy, strengthens muscles, and promotes overall health for all ages. A simple recipe using soaked almonds, dates, milk, and cardamom offers a delicious and healthy treat.