Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ६० सेकंदात तयार होणाऱ्या डोसा पिठाची रेसिपी-पौष्टिक-झटपट आणि चविष्ट-मुलांच्या डब्यासाठी उत्तम

६० सेकंदात तयार होणाऱ्या डोसा पिठाची रेसिपी-पौष्टिक-झटपट आणि चविष्ट-मुलांच्या डब्यासाठी उत्तम

Dosa batter recipe that is ready in 60 seconds - nutritious - quick and tasty - great for kids' lunchboxes : खास डोसा रेसिपी. नक्की करुन पाहा. चव आणि पोषण दोन्ही मिळवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 08:30 IST2026-01-29T08:30:00+5:302026-01-29T08:30:02+5:30

Dosa batter recipe that is ready in 60 seconds - nutritious - quick and tasty - great for kids' lunchboxes : खास डोसा रेसिपी. नक्की करुन पाहा. चव आणि पोषण दोन्ही मिळवा.

Dosa batter recipe that is ready in 60 seconds - nutritious - quick and tasty - great for kids' lunchboxes | ६० सेकंदात तयार होणाऱ्या डोसा पिठाची रेसिपी-पौष्टिक-झटपट आणि चविष्ट-मुलांच्या डब्यासाठी उत्तम

६० सेकंदात तयार होणाऱ्या डोसा पिठाची रेसिपी-पौष्टिक-झटपट आणि चविष्ट-मुलांच्या डब्यासाठी उत्तम

आजच्या धावपळीच्या जीवनात आहारात पौष्टिक आणि पचायला हलके पर्याय निवडणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. अशा वेळी ज्वारीचा डोसा हा चव आणि पोषण यांचा उत्तम समतोल साधणारा पदार्थ ठरतो. (Dosa batter recipe that is ready in 60 seconds - nutritious - quick and tasty - great for kids' lunchboxes)पारंपरिक डोशापेक्षा वेगळा असला तरी ज्वारीचा डोसा चवीला रुचकर आणि शरीरासाठी फायदेशीर आहे, म्हणूनच तो आहारात नक्की समाविष्ट करावा असा पदार्थ आहे.

ज्वारी हे भारतीय स्वयंपाकघरातील जुने आणि विश्वासार्ह धान्य आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, लोह, कॅल्शियम आणि बी-समूहातील जीवनसत्वे आढळतात. ज्वारीचा डोसा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. वजन नियंत्रणात ठेवण्याचा विचार करणार्‍यांसाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. एकदा हा पदार्थ नक्कीच करुन पाहा. रात्रभर भिजवण्याची वगैरे गरज नाही. 

साहित्य 
ज्वारीचे पीठ, रवा, तांदूळ पीठ, मिरी पूड, हिरवी मिरची, पाणी, तूप, कोथिंबीर, कांदा, मीठ, कडीपत्ता

कृती
१. ज्वारीचे पीठ एका खोलगट पातेल्यात घ्यायचे. त्यात थोडा रवा घालायचा. तसेच थोडे तांदूळाचे पीठही घालायचे. हिरवी मिरची बारीक चिरायची. तसेच कडीपत्त्याची पानेही चिरुन घ्यायची. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची आणि निवडायची, स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिश्रणात घाला. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. थोडी काळीमिरी पूड घालायची. मिक्स करायचे आणि त्यात पाणी ओतायचे. पातळ पीठ तयार करायचे. 

२. ढवळून पीठ नीट मिक्स करायचे, त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. पातळ पीठ तयार करायचे. नंतर झाकून ठेवायचे. दहा मिनिटांसाठी झाकून ठेवा आणि नंतर पुन्हा जरा ढवळून घ्या. 

३. पॅन गरम करायचा. गरम पॅनमध्ये तयार मिश्रण ओतायचे. पातळ थरच लावायचा. जरा शिजले की त्याला तूप लावायचे. पॅन नॉनस्टीकीच वापरा. तूप लावल्यावर डोसा पॅन सोडायला लागेल. एका बाजूने पूर्ण रंग बदलून सोनेरी झाला की तो काढून घ्यायचा. एकाच बाजूने परता. सोबत आवडती चटणी घ्या.    

Web Title : झटपट ज्वार डोसा: 60 सेकंड में तैयार, पौष्टिक और बच्चों के लिए!

Web Summary : ज्वार डोसा, पारंपरिक डोसा का एक पौष्टिक और त्वरित विकल्प, व्यस्त जीवनशैली के लिए एकदम सही है। फाइबर, आयरन और विटामिन से भरपूर, यह आपको अधिक समय तक भरा रखता है, जिससे वजन प्रबंधन में मदद मिलती है। इस आसान रेसिपी को रात भर भिगोने की आवश्यकता नहीं है और यह बच्चों के लंचबॉक्स के लिए आदर्श है।

Web Title : Quick & Nutritious Jowar Dosa: Ready in 60 Seconds, Kid-Friendly!

Web Summary : Jowar dosa, a nutritious and quick alternative to traditional dosa, is perfect for busy lifestyles. Rich in fiber, iron, and vitamins, it keeps you full longer, aiding in weight management. This easy recipe requires no overnight soaking and is ideal for children's lunchboxes.