Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आंबट चिंबट पदार्थ आवडतात? मग ही कैरी टोमॅटोची चटणी करायलाच हवी, फारच चविष्ट आणि सोपी .

आंबट चिंबट पदार्थ आवडतात? मग ही कैरी टोमॅटोची चटणी करायलाच हवी, फारच चविष्ट आणि सोपी .

Do you like tangy raw mango? Then you must try this Kairi Tomato Chutney, very tasty and easy : कैरी आणि टोमॅटोची चविष्ट चटणी नक्की करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 16:59 IST2026-04-07T16:58:27+5:302026-04-07T16:59:58+5:30

Do you like tangy raw mango? Then you must try this Kairi Tomato Chutney, very tasty and easy : कैरी आणि टोमॅटोची चविष्ट चटणी नक्की करा.

Do you like tangy raw mango? Then you must try this Kairi Tomato Chutney, very tasty and easy. | आंबट चिंबट पदार्थ आवडतात? मग ही कैरी टोमॅटोची चटणी करायलाच हवी, फारच चविष्ट आणि सोपी .

आंबट चिंबट पदार्थ आवडतात? मग ही कैरी टोमॅटोची चटणी करायलाच हवी, फारच चविष्ट आणि सोपी .

कैरी टोमॅटो चटणी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय, चविष्ट आणि ऋतूनुसार बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कच्च्या कैऱ्या बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात, त्याच वेळी टोमॅटोही सहज मिळतात. या दोन्हींच्या मिश्रणातून तयार होणारी ही चटणी आंबट, किंचित गोड आणि तिखट अशा तिन्ही चवींचा सुंदर समतोल साधते. (Do you like tangy raw mango? Then you must try this Kairi Tomato Chutney, very tasty and easy.)या चटणीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची ताजी, झणझणीत आणि चटकदार चव. कैरीमुळे येणारा नैसर्गिक आंबटपणा आणि टोमॅटोमुळे मिळणारी हलकी गोडसर व रसाळ चव यामुळे ही चटणी खूपच रुचकर बनते. त्यामुळे साध्या जेवणालाही ही चटणी खास बनवते.

ग्रामीण भागात आणि घरगुती स्वयंपाकात ही चटणी खास करून पोळी, भाकरी, वरण-भात किंवा डब्यासाठी बनवली जाते. काही घरांमध्ये ही चटणी सणासुदीच्या जेवणात किंवा खास उन्हाळी मेनूमध्येही दिसते. तिची चव वेळेनुसार थोडी बदलते, विविध प्रकारे केली जाते. ताजी असताना ती अधिक खमंग आणि चटकदार लागते त्यामुळे ताजी करुनच खायची. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य 
कैरी, टोमॅटो, लसूण, लाल तिखट, तेल, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ

कृती
१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या.  टोमॅटोचे दोन तुकडे करायचे. कैरीचेही दोन तुकडे करायचे. बाट किंवा कोय काढून टाकायची. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात टोमॅटो नीट लावून ठेवायचे. सालाची बाजू वरच्या दिशेने  ठेवायची. कैरीही साल वरच्या दिशेने करुन ठेवायची. लसणाच्या पाकळ्याही घालायच्या आणि हिरवी मिरचीही घालायची. 

२. त्यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. नंतर झाकण काढून टाका आणि सालं काढून घ्या. जरा पाच मिनिटे परतून घ्या. नंतर ताटात काढून घ्या. सगळे पदार्थ गार होऊ द्या. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात लाल तिखट घालायचे. बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची तसेच बारीक चिरलेला कांदाही घालायचा. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. चटणी मस्त वाटून घ्यायची. एकजीव करायची. 

Web Title : खट्टे आम टमाटर की चटनी: एक सरल और स्वादिष्ट रेसिपी

Web Summary : यह महाराष्ट्रीयन चटनी कच्चे आम, टमाटर और मसालों का मिश्रण है जो खट्टा, मीठा और मसालेदार स्वाद देती है। रोटी, भाकरी या चावल के साथ बिल्कुल सही, यह गर्मी के दौरान किसी भी भोजन को बढ़ाने का एक सरल, स्वादिष्ट तरीका है।

Web Title : Tangy Raw Mango Tomato Chutney: A Simple & Delicious Recipe

Web Summary : This Maharashtrian chutney blends raw mango, tomato, and spices for a tangy, sweet, and spicy flavor. Perfect with roti, bhakri, or rice, it's a simple, delicious way to enhance any meal, especially during summer.