Join us

Diwali Diet Chivda Recipe : दिवाळीत करा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा फक्त दहा मिनिटांत, खा टेंशन फ्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 19:37 IST

Diwali Diet Chivda Recipe: Make delicious and crispy Makhana Chivda in just ten minutes this Diwali, eat tension free! : चविष्टही आणि पौष्टिकही नक्की करा हा चिवडा.

मखाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे कमी कॅलरीचे असून प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदयाचे स्वास्थ्य सुधारते, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी राहतो आणि वजन नियंत्रणात ठेवते. मखाण्यांतील मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवतात, स्नायूंचा विकास होतो,पचनास मदत करतात. त्याचा डाएट चिवडा खाल्ल्याने ऊर्जा मिळते, शरीर हलके राहते आणि लठ्ठपणावर नियंत्रण राहते. (Diwali Diet Chivda Recipe: Make delicious and crispy Makhana Chivda in just ten minutes this Diwali, eat tension free!)हे स्नॅक म्हणून हलके, कुरकुरीत आणि चविष्ट असल्यामुळे मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते. नियमित खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते, मेंदू सक्रिय राहतो आणि शरीरातील इतरही पोषण घटक चांगले राहतात. तसेच, मखाण्यांमुळे थकवा कमी होतो आणि मानसिक ताण कमी होतो, त्यामुळे दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

साहित्यमखाणा, लाल तिखट, मीठ, जिरं, शेंगदाणे, सुकं खोबरं, हळद, कडीपत्ता, मोहरी, तेल 

कृती१. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. अगदी चमचाभर तेल घ्या. त्यात थोडी हळद घाला आणि त्यावर मखाणे परतून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. छान कुरकुरीत होत आल्यावर काढून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. त्याच पॅनमध्ये अगदी थोडे तेल घ्यायचे. त्यात कडीपत्त्याची पाने घाला आणि परतून घ्या. 

२. कडीपत्ता मस्त परतायचा आणि काढून घ्यायचा. तसेच सुक्या खोबऱ्याचे लहान आणि पातळ असे तुकडे घाला ते ही परता. परतून झाल्यावर काढून घ्या. शेंगदाणे मस्त खमंग परतायचे. सारे पदार्थ परतून झाल्यावर त्याच कढईत अगदी थेंबभर तेल घ्या आणि त्यात मोहरी घाला. मोहरी मस्त तडतडू द्या. मोहरी तडतडल्यावर सगळे परतलेले पदार्थ एकत्र करायचे. पहिले सुकं खोबरं नंतर शेंगदाणे आणि कडीपत्ता घालायचा. तसेच जिरं घाला आणि मग मखाणे घाला. थोडे लाल तिखट घाला आणि छान खमंग परता. गॅस मध्यमच ठेवा. मोठा केला तर सगळे पदार्थ करपतात. त्यात गरजे पुरते मीठ घालायचे. 

३. चिवडा तयार झाल्यावर पसरट भांड्यात काढून घ्या. छान पसरवा आणि मग गार करत ठेवायचा. गार झाल्यावर एका हवा बंद डब्यात काढून घ्यायचा. महिनाभर छान कुरकुरीत राहतो.   

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Diet: Quick & Healthy Makhana Chivda Recipe in Minutes!

Web Summary : Enjoy guilt-free Diwali snacking with this quick makhana chivda recipe. Makhana is packed with nutrients, aids weight management, and boosts energy. Roast makhana with spices and nuts for a healthy, delicious treat.
टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स