दिवाळीला (Diwali 2025) प्रत्येक घरात चकली मोठ्या आवडीनं खाल्ली जाते. पण परफेक्ट चकली करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. चकली करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते (Diwali Faral Recipe). काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो कराव्या लागतात तेव्हा कुठे परफेक्ट चकली जमते (Poha Chakali Recipe). तांदूळाची, गव्हाच्या पीठाची चकली तुम्ही खूपदा खाल्ली असेल पण पोह्यांची चकलीसुद्धा चवीला उत्तम लागते. पोह्यांची चकली करण्याची खास रेसिपी पाहूया. ही चकली तुम्ही कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात बनवू शकता. पोह्यांची चकली करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Poha Chakali)
पीठ तयार करा
सगळ्यात आधी पोहे आणि डाळवं मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवून घ्या. हे पीठ चाळणीनं चाळून घ्या. आता एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात पोहे आणि डाळव्याचे चाळलेले पीठ घ्या. त्यात तांदळाचे पीठ घाला आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
मसाले घाला
तयार केलेल्या पिठात तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्या.
मोहन घाला
कढईत ३ ते ४ चमचे तूप व्यवस्थित गरम करून घ्या. हे गरम तुपाचे मोहन पिठावर ओता आणि मग चमच्याच्या साहाय्यानं किंवा हलक्या हातानं पिठात मिक्स करून घ्या. मोहन गरम असल्यामुळे हात भाजणार नाही याची काळजी घ्या.
न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या १० टिप्स, परफेक्ट होतील लाडू
पीठ मळणं
आता गरम पाणी थोडं थोडं करून पिठात घाला आणि पीठ मळून घ्या. पीठ खूपच घट्ट किंवा खूपच सैल नसावं. चकलीसाठी पीठ नेहमीपेक्षा थोडं मऊ मळावं जेणेकरून चकली पाडताना ती तुटणार नाही. मळलेलं पीठ १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा.
घरीच छोट्या टोपलीत लावा कोथिंबीर; कमी जागेत ताजी- हिरवीगार कोथिंबीर भराभर वाढेल
चकली पाडणं
चकलीच्या साच्याला आतून तेलाचा हात लावा. मळलेल्या पिठाचा एक गोळा सोऱ्यामध्ये भरा. एका प्लास्टीकच्या कागदावर किंवा ताटात गोल चकल्या पाडून घ्या. चकलीचे टोक दाबून जोडून घ्या.
चकली तळणं
कढईत तेल मध्यम आचेवर चांगलं गरम करून घ्या. चकली तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करा. जर तेल खूपच थंड असेल तर चकली तेल शोषून घेईल आणि जर खूपच गरम असले तर लगेच लाल होईल पण आतून कच्ची राहील. चकली हलक्या हातानं तेलात सोडा. चकली लगेच पलटू नका. एका बाजूनं थोडी सोनेरी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनं पलटून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून चकल्या कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या चकल्या टिश्यूपेपरवर काढून घ्या. तयार आहे पोह्यांची कुरकुरीत चकली . चकली पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरा.