Lokmat Sakhi >Food > काकडी-ओल्या नारळाचा डोसा, ‘असा’ भारी डोसा तुम्ही आजवर नसेल खाल्ला! पाहा सोपी चविष्ट रेसिपी

काकडी-ओल्या नारळाचा डोसा, ‘असा’ भारी डोसा तुम्ही आजवर नसेल खाल्ला! पाहा सोपी चविष्ट रेसिपी

Cucumber-coconut dosa recipe, the easy and delicious recipe tasty also : असा डोसा नक्कीच खाल्ला नसेल. पाहा कसा करायचा काकडीचा डोसा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 19:08 IST2025-07-02T19:05:34+5:302025-07-02T19:08:27+5:30

Cucumber-coconut dosa recipe, the easy and delicious recipe tasty also : असा डोसा नक्कीच खाल्ला नसेल. पाहा कसा करायचा काकडीचा डोसा.

Cucumber-coconut dosa recipe, the easy and delicious recipe flavourful and tasty also | काकडी-ओल्या नारळाचा डोसा, ‘असा’ भारी डोसा तुम्ही आजवर नसेल खाल्ला! पाहा सोपी चविष्ट रेसिपी

काकडी-ओल्या नारळाचा डोसा, ‘असा’ भारी डोसा तुम्ही आजवर नसेल खाल्ला! पाहा सोपी चविष्ट रेसिपी

नाश्त्यासाठी डोसा हा पदार्थ अनेकदा केला जातो. तसेच आंबोळी केली जाते. काही वेगळे पदार्थ करायचे म्हटले की काय करावे सुचत नाही. (Cucumber-coconut dosa recipe,  the easy and delicious recipe flavourful and tasty also)काही रेसिपी असतात ज्या आपल्यापर्यंत जरा उशीरा पोहचतात अशीच एक मस्त रेसिपी म्हणजे हा काकडी डोसा. एकदम मऊ आणि जाळीदार होतो. पाहा कसा करायचा. 

साहित्य
काकडी, तांदूळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे, नारळ, भात, पोहे, तेल, पाणी, हिरवी मिरची  

कृती
१. एका खोलगट पातेल्यात तुटका तांदूळ घ्यायचा. तांदूळ व्यवस्थित धुवायचे. मग एका खोलगट पातेल्यात ठेवायचे. उडदाची थोडी दोन ते चार चमचे डाळ त्यात घालायची. मेथीचे चार दाणे घालायचे. पाणी ओतायचे आणि रात्रभर भिवायचे. 

२. भिजवून झाल्यावर त्यातील पाणी काढून टाकायचे. एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ घ्यायचे. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. मस्त ताजा नारळ घ्यायचा आणि फोडून घ्यायचा. नारळ मस्त खवायचा आणि ताजा नारळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. 

३. दोन ताज्या काकड्या घ्यायच्या. काकडी किसायची आणि मग तुकडे करायचे. काकडीचे तुकडे जरा लहान करा. पटकन वाटले जातील असे तुकडे करायचे. कडू नाही ना हे तपासायला विसरु नका. 

४.  पोहे भिजवायचे आणि भातही करुन घ्यायचा. रोज जसा भात करता तसाच. वाटीभर भात आणि अर्धी वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. नारळ आणि मिरची तसेच इतर पदार्थ घेतल्यावर त्यात पाणी घालायचे अगदी थोडे पाणी घाला. काकडीचे तुकडे घाला आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. मस्त पीठ तयार करायचे. पीठ पातळ करायचे नाही. ते जरा घट्टच हवे म्हणजे जाळीदार मस्त डोसा घालता येतो.

५. तवा गरम करायचा. तवा तापल्यावर त्यावर तेल लावायचे आणि मग मस्त डोसा लावायचा. लहान आकाराचे गोल डोसे लावा म्हणजे पटकन  सुटतात. लांब मोठे डोसे लावायचे नाहीत. आंबोळी सारखे तयार करा. बाजूने तेल सोडा झाका आणि शिजल्यावर पलटून घ्यायचे. दोन्ही कडून छान परतून घ्यायचे आणि मग गरमागरम खायचे. चटणीसोबत खा किंवा आंब्याचे लोणचे सोबतीला घ्यायचे.  
   

Web Title: Cucumber-coconut dosa recipe, the easy and delicious recipe flavourful and tasty also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.