विविध प्रकारचे स्नॅक्स घरी करता येतात. त्यातील एक मस्त प्रकार म्हणजे मसाला शेंगदाणे. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. लहान मुलांना खायला द्यायला हा पदार्थ एकदम मस्त आहे. एकदा केला की महिनाभर टिकतो. (Crunchy spiced peanuts are a treasure trove of flavor - very easy to make at home)हबावंद डब्यात ठेवायचे. एकदम कुरकुरीत होतात. तसेच करायला सोपे आहेत. शेंगदाणे आणि बेसन पीठ वापरुन हा पदार्थ करता येतो. पाहा कसा करायचा.
साहित्य
शेंगदाणे, बेसन, लाल तिखट, मीठ, धणे - जिरे पूड, पाणी, हिंग, हळद, लिंबू, तेल, चाट मसाला
कृती
१. एका पातेल्यात वाटीभर बेसन पीठ घ्यायचे. जेवढे शेंगदाणे तेवढं बेसन हे प्रमाण ठेवायचे. बेसन पिठात चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. चमचाभर हिंग घालायचे. तसेच चवीपुरते मीठ घालायचे. त्यात अर्धी वाटी पाणी घालायचे आणि जरा घट्टसर मिश्रण तयार करायचे. ढवळत राहायचे त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.
२. तयार बेसन पिठात लिंबाचा रस घालायचा. तसेच शेंगदाणे घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. शेंगदाण्यांना सगळीकडे नीट पीठ लागेल याची काळजी घ्यायची. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर त्यात मिश्रण ओतायचे. चमच्याने शेंगदाणे वेगळे करुन घ्यायचे. मस्त परतायचे. छान कुरकुरीत होतात.
२. एका वाटीत चमचाभर लाल तिखट घ्यायचे. चमचाभर मीठ घ्यायचे. चमचाभर चाट मसाला घ्यायचा आणि थोडी धणे-जिरे पूड घ्यायची. मसाला छान मिक्स करायचा. तयार शेंगदाणे गार झाले की त्यात मसाला घालायचा आणि ढवळायचे. सगळीकडे एक समान मसाला लागेल याची काळजी घ्यायची. हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे.
