lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

Crispy Aloo Pakora/ Batata Bhajji without Soda : टम्म फुगलेली क्रिस्पी बटाट्याची भजी कशी तयार करायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 01:12 PM2024-05-08T13:12:52+5:302024-05-08T13:13:45+5:30

Crispy Aloo Pakora/ Batata Bhajji without Soda : टम्म फुगलेली क्रिस्पी बटाट्याची भजी कशी तयार करायची?

Crispy Aloo Pakora/ Batata Bhajji without Soda | टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

उन्हाळा असो किंवा हिवाळा भजी खाण्याची इच्छा अनेकदा होतो (Potato Bhaji). भजी खायला काळवेळ लागत नाही. भजी विविध प्रकारचे केले जातात. कांदा, पालक, बटाटा भजी आपल्या घरी हमखास केली जाते (Pakoras). त्यात बटाटा भजी खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. पण बटाटा भजी वाटते तशी, करायला सोपी अजिबात नाही (Cooking Tips).

कधी बटाटा भजी करताना बॅटर बिघडतं, तर बटाटा भजी कधी जास्त प्रमाणात तेल शोषून घेते. बऱ्याचदा विकतची आणलेली भजी फार तेलकट असतात. जर आपल्याला घरातच हॉटेलस्टाईल भजी तयार करून खायची असेल तर, एकदा ही रेसिपी फॉलो करून पाहा. कमी वेळात झटपट कुरकुरीत भजी तयार होतील(Crispy Aloo Pakora/ Batata Bhajji without Soda).

हॉटेलस्टाईल भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटा 

बेसन

सावधान! तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? '४' टिप्स, प्लास्टिक तांदूळ ' असा ' ओळख

तांदुळाचं पीठ 

मीठ 

हळद 

ओवा 

मिरची 

लसूण 

पाणी

कृती

बटाटाची भजी करण्यापूर्वी मोठ्या आकाराचे बटाटे पाण्यात घालून धुवून घ्या. नंतर पिलरने बटाट्याची साल काढून घ्या. आता एका भांड्यात पाणी घ्या. सुरीने बटाट्याच्या गोल आकारामध्ये चकत्या कापा आणि भांड्यात घेतलेल्या पाण्यात घालून धुवून घ्या.

आता एका भांड्यात एक कप बेसन, अर्धा कप तांदुळाचं पीठ, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा.

ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

एका खलबत्त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या, ३ ते ४ हिरव्या मिरच्या घालून ठेचून घ्या. तयार ठेचा पिठात घालून मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा, आणि सरसरीत बॅटर तयार करा. भजी तळण्यासाठी एका कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा.

तयार बॅटरमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता बॅटरमध्ये बटाट्याच्या चकत्या बुडवून तेलात सोडा, व दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तळून घ्या. आशाप्रकारे कुरकुरीत हॉटेलस्टाईल भजी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Crispy Aloo Pakora/ Batata Bhajji without Soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.