lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Cooking Tips: भाजीत तेल खूप जास्त झालं? ४ सोप्या ट्रिक्स- तेल होईल चटकन कमी, भाजी होईल टेस्टी

Cooking Tips: भाजीत तेल खूप जास्त झालं? ४ सोप्या ट्रिक्स- तेल होईल चटकन कमी, भाजी होईल टेस्टी

Cooking Hacks: कधी कधी गडबडीत असं होऊन जातं... भाजी झाल्यावर तिच्यावर तेलाचा नुसता तवंग दिसू लागतो. हे तेल (too much oil in food) कमी करण्यासाठीच तर या काही खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 07:35 PM2022-05-28T19:35:28+5:302022-05-28T19:36:36+5:30

Cooking Hacks: कधी कधी गडबडीत असं होऊन जातं... भाजी झाल्यावर तिच्यावर तेलाचा नुसता तवंग दिसू लागतो. हे तेल (too much oil in food) कमी करण्यासाठीच तर या काही खास टिप्स...

Cooking Tips: How to remove extra oil from the vegetable or sabji? 4 simple tricks and tips | Cooking Tips: भाजीत तेल खूप जास्त झालं? ४ सोप्या ट्रिक्स- तेल होईल चटकन कमी, भाजी होईल टेस्टी

Cooking Tips: भाजीत तेल खूप जास्त झालं? ४ सोप्या ट्रिक्स- तेल होईल चटकन कमी, भाजी होईल टेस्टी

Highlightsतेलाचा तवंग झटकन कमी करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा.

स्वयंपाक करताना तेल, तिखट, मीठ, साखर असं सगळं बेताचं टाकून पदार्थ अधिकाधिक चवदार करण्याचा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. बरेच जण हेल्थ कॉन्शस असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कमीतकमी तेलात भाज्या करण्याचा प्रयत्न केला जातोच. पण कधी तरी अंदाज हुकतोच आणि गरजेपेक्षा जरा जास्त तेल पडतं. (extra oil in food) एखाद्या रस्सा भाजीवर जेव्हा भला मोठा तवंग दिसू लागतो, तेव्हा आपल्याला आपली चूक कळते. अशावेळी अजिबात टेन्शन घेऊ नका..(tips for healthy cooking)  हा तेलाचा तवंग झटकन कमी करण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा. तेल तर कमी होईलच पण भाजी हमखास अधिक चवदार होईल हे नक्की...(4 tricks to remove extra oil from food)

 

भाजीमध्ये तेल जास्त पडल्यास....
१. सुकी भाजी करत असताना तेल जरा जास्त पडलं तर एक सोपा उपाय म्हणजे कढई थोडी तिरकी करा. भाजी चमच्याने दाबा आणि त्यातून निथळणारं तेल चमच्याने काढून टाका.
२. दुसरा उपाय म्हणजे कोणत्याही सुक्या भाजीत तेल जास्त झालं तर त्यात एक तर दाण्याचा कुट टाका किंवा मग थोडं बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ टाका. पीठ टाकण्याआधी ते कढईत किंवा तव्यावर थोडंसं भाजून घ्यावं आणि नंतर टाकावं. म्हणजे भाजी अधिक खमंग कुरकुरीत होईल.

 

३. मसालेदार ग्रेव्हीची भाजी केली असेल आणि त्या भाजीत जर तेलाचा जास्तच तवंग दिसू लागला असेल तर त्या भाजीत उकडलेले बटाटे टाकून द्या. अर्ध्या तासात बटाटे अतिरिक्त तेल शोषून घेतील आणि भाजीवर दिसणारा तवंग नाहीसा होईल. यासाठी मध्यम आकाराची कढई भरून भाजी असेल तर त्यात साधारण २ ते ३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकावेत.
४. अशाच पद्धतीने ब्रेड क्रम्स टाकूनही भाजीचा तेलकटपणा कमी करता येतो. ब्रेडक्रम्स नसले तर साधा ब्रेड थोडेसे तूप लावून तव्यावर भाजून घ्या. भाजलेला ब्रेड अर्ध्या मिनिटातच कडक होईल. असा कडक झालेला ब्रेड भाजीच्या वर दिसणाऱ्या तेलावरून अलगद फिरवा. तेल शोषले जाईल.

 

Web Title: Cooking Tips: How to remove extra oil from the vegetable or sabji? 4 simple tricks and tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.