Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dussehra 2025 : पुरणासाठी डाळ शिजवताना पाणी जास्त होतं, कुकरमधून फसफसून बाहेर येतं? २ टिप्स- पुरण होईल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 19:50 IST

Cooking Tips for Puran Poli: दसऱ्याला किंवा नवमीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी करणार असाल तर पुरण शिजवताना पाण्याचे प्रमाण बिघडू नये म्हणून काय करावं? (what is the correct ratio of chana dal and water for cooking puran?)

ठळक मुद्दे डाळ आणि पाण्याचा अंदाज न आल्याने पुरण कधी कच्चं राहातं तर कधी त्यात खूपच पाणी होतं.

दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी कुलाचार म्हणून देवीच्या नैवेद्यासाठी अनेक घरांमध्ये पुरण शिजविण्याची प्रथा आहे. आता पुरण शिजवणे हे खरच एखाद्या सुगरणीचे काम. कारण पुरण करता आलं आणि पुरणपोळी उत्तम लाटता आली तर ती सुगरण आहे असं आपल्याकडे मानलं जातं. आता ज्यांना वर्षानुवर्षांपासून पुरणाचा स्वयंपाक करण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी पुरणपोळी करणे काही अवघड नसते. पण ज्या नव्यानेच पुरणाचा स्वयंपाक करून पाहतात त्यांची मात्र बऱ्याचदा फजिती होते. डाळ आणि पाण्याचा अंदाज न आल्याने पुरण कधी कच्चं राहातं तर कधी त्यात खूपच पाणी होतं (what is the correct ratio of chana dal and water for cooking puran?). असं होऊ नये म्हणून नेमकं काय करावं ते पाहा..(Cooking Tips for Puran Poli)

 

पुरणासाठी डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण किती ठेवावे?

पुरण करण्यासाठी सगळ्यात आधी तर हरबरा डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

यानंतर जर तुम्ही एक वाटी हरबरा डाळ घेतली असेल तर ती शिजवण्यासाठी कुकरमध्ये साधारण दोन ते अडीच वाटी पाणी घाला. कारण डाळ छान मऊसूत शिजण्यासाठी तिला भरपूर पाणी लागतं.

केसांसाठी घरीच तयार करा नॅचरल हेअर डाय- पांढरे केस होतील काळेभोर, चमकदार

आपण जेव्हा वरण आणि भात कुकरमध्ये शिजायला लावतो तेव्हा डाळ आणि तांदूळ डब्यांमध्ये घालून मग ते डबे कुकरमध्ये ठेवतो.

 

पण पुरणाच्या बाबतीत मात्र असं करू नका. पुरणासाठी डबे न वापरता डाळ थेट कुकरमध्येच शिजायला घाला.

मूल कोणत्या बाबतीत आईवर जातं आणि कोणत्या गोष्टी वडिलांकडून घेतं? बघा रंजक माहिती... 

पुरण शिजवताना एक गोष्टी अगदी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे पुरण कधीही मोठ्या गॅसवर शिजवू नये. यामुळे शिट्टी होताच त्याच्यातलं पाणी बाहेर येतं आणि डाळ चांगली शिजत नाही. गॅसची फ्लेम मंद ते मध्यम आचेवर ठेवूनच नेहमी पुरण शिजवावे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Dussehra Puran Recipe: Perfect Puran with These Cooking Tips

Web Summary : Achieve perfect Puran for Dussehra by using the right water ratio (2-2.5 cups per cup of dal). Cook on medium heat directly in the cooker, avoiding high flames for best results.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दसरापाककृतीकिचन टिप्सपाणी