नारळ हा आपल्या आहारातील एक अत्यंत उपयोगी आणि पौष्टिक घटक मानला जातो. त्याचा उपयोग फक्त चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फार महत्त्वाचा आहे. पारंपरिक भारतीय आहारात नारळाचा वापर अनेक स्वरुपात केला जातो. (Coconut is very nutritious for health, but these mistakes can make it troublesome. Avoid these mistakes while eating coconut because...)कधी त्याचे पाणी प्यायले जाते, कधी त्याची मलाई आवडीने खाल्ली जाते. तर कधी त्याचे तेल किंवा दूध पदार्थांमध्ये वापरले जाते. प्रत्येक स्वरुपात नारळ शरीराला वेगवेगळे फायदे देतो. स्वरुपानुसार सगळ्याच पदार्थांचे फायदे बदलतात.
नारळात नैसर्गिक चरबी, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि स्नायूंना बळकटी येते. नारळातील तंतू पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यात असलेले लॉरिक अॅसिड हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे सर्दी, खोकला किंवा संसर्गांपासून बचाव होतो. तसेच नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट असल्याने उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढते.
आमटीमध्ये भाजीत खवलेला नारळ घातला जातो. नारळाची चटणी केली जाते. नारळाचे दूध तयार करतात. हे सारे पदार्थ आरोग्यासाठी फार फायद्याचे असतात. मात्र फोडणीत, भाजीत, आमटीत नारळ घालणे सगळ्यांनाच झेपते असे नाही. त्यामुळे काहींना पित्ताचा त्रास होतो. नारळ पाणी व्यायामानंतर प्यायल्यास शरीरातील थकवा कमी होतो आणि ताजेतवानेपणा मिळतो. नारळ पाणी प्रचंड पौष्टिक आहे. शरीरासाठी फार उपयुक्त ठरते. तसेच नारळ तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. मात्र नारळ तेलाचा वापर स्वयंपाकासाठी मर्यादित प्रमाणात करावा, कारण ते हृदयासाठी फायदेशीर असले तरी त्यात सॅच्युरेटेड फॅट्सही असतात.
अति प्रमाणात नारळाचे सेवन मात्र टाळावे. जास्त नारळ खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. काही वेळा पचनसंस्थेवर ताण येऊन गॅस किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच नारळाचे फायदे मिळवायचे असतील तर त्याचे सेवन संतुलित प्रमाणात करणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उलट्या होतात. तसेच नारळामुळे खोकलाही वाढतो. त्यामुळे नारळ खाताना जरा काळजी घ्या.
