हिवाळा सुरू होताच आहारातही बदल होतात. हिवाळ्यात लोक डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, आलू पराठा आणि गाजर हलवा खातात. काही पदार्थ आरोग्यदायी असतात, पण त्यामुळे वजन वाढू शकतं. वजन वाढणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी हिवाळ्यात काय खाणं टाळावं याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आवळा कँडी
आवळ्यात व्हिटॅमिन सी असतं, जे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, परंतु आवळा कँडी आरोग्यासाठी जास्त चांगली नसते, कारण त्यात साखर असते. साखर शरीरासाठी हानिकारक असते. यापेक्षा तुम्ही फक्त आवळा खा.
च्यवनप्राश
कुटुंबातील वृद्ध लोक हिवाळ्यात च्यवनप्राश खातात. मुलांना अनेकदा दुधासोबत च्यवनप्राश दिलं जातं. च्यवनप्राशऐवजी,तुम्ही त्यांना भाज्यांचं सूप देऊ शकता. सूप अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आणि शुगर फ्री असतं. बाजारात उपलब्ध असलेल्या च्यवनप्राशमध्ये हेवी मेटल असल्याचं वृत्त आहे.
ड्रायफ्रूटचे लाडू
ड्रायफ्रूटचे लाडू हे चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, पण त्यात कॅलरीज जास्त असतात. जर तुम्हाला वजन कमी करायची असेल, तर लाडू टाळा आणि मूठभर ड्रायफ्रूट खा.
जास्त तूप
जर तुम्हाला वजन वाढू नये असं वाटत असेल, तर जास्त प्रमाणात तूप खाणं टाळा. हिवाळ्यातील एक्टिव्हिटीज लक्षणीयरीत्या कमी होतात आणि जास्त कॅलरीज घेतल्याने वजन लवकर वाढू शकतं.
पॅकेज्ड सूप
हिवाळ्यात प्रत्येकाला सूप आवडतं, परंतु पॅकेज्ड पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. या सूपमध्ये कमी किंवा अजिबात पोषक घटक नसतात. सूपमधील प्रिझर्व्हेटिव्ह हानिकारक असू शकतात. तुम्ही घरी ताज्या भाज्यांचं सूप बनवू शकता.
