लहानपण म्हणजे साध्या गोष्टींमधला आनंद… आणि त्या साध्या गोष्टींमधली आईच्या हातची तिखट पोळी ही एक खास आठवण. आज कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले, तरी त्या तिखट पोळीची चव आणि तिच्यासोबतच्या आठवणींची सर कशालाच नाही. पोळी म्हणा तिखटाची चपाती म्हणा किंवा कणकेचा पराठा म्हणा सगळ्यांनीच लहानपणी आवडीने खाल्ली आहे. (Childhood memories, spicy recipe, tastes just like mom used to make - check out this easy recipe, special memories)ही पोळी साधीच असायची, मात्र जिऱ्या सुगंध तिखटाची झणझणीत चव आणि तव्यावर भाजताना घरभर दरवळणारा खमंग वास हे सगळं अजूनही मनात ताजं आहे. नंतर त्यात चीज घातले जाऊ लागते, कोथिंबीरही घालता येते. लसूण घालता येतो. विविध प्रकारे ही पोळी करता येते. अगदी सामान्य रेसिपी पाहा.
साहित्य
कणीक, तूप, मीठ, जिरे, लाल तिखट, पाणी
कृती
१. नेहमी जसे मळता तसेच पोळीचे पीठ मळून घ्यायचे. कणकेत थोडं थोडं पाणी घालून छान मऊसर कणीक मळायची. नंतर थोडा वेळ झाकून ठेवायची आणि पुन्हा छान मळायची. त्याचे गोळे तयार करायचे. लाटायला घ्यायचे आणि लहान मध्यम पोळी लाटायची.
२. त्यावर चमचाभर तूप घालायचे. तुपावर लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. तसेच चमचाभर जिरे घालायचे हाताने ते मिश्रण कालवून पोळीवर पसरवायचे. पोळी सगळ्या बाजूंनी बंद करायची आणि चौकोनी किंवा गोलाकार लाटून घ्यायची.
३. तव्याला तूप लावायचे. त्यावर पराठा परतून घ्यायचा. दोन्ही बाजूंनी खमंग परतून घ्यायचा. गरमागरम पराठा दही किंवा भाजीसोबत खा. नुसताही फार चविष्ट लागतो. लहानपणी नक्कीच खाल्ला असते.
