हिवाळ्यात वारंवार भूक लागते. वरचेवर तोंडात टाकायला काय करावे याचा विचार करत असाल तर चिक्कीपेक्षा उत्तम पर्याय नाही. बाजारात चिक्की मिळते, पण त्यात गूळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट कोणत्या गुणवत्तेचे असतात हे माहीत नसते. शिवाय स्वच्छतेचाही अभाव असतो. त्यामुळे पुढे दिलेली रेसिपि अचूक प्रमाणासह करा, चिवट तर होणार नाहीच, उलट चविष्ट आणि खुटखुटीत होईल.
खुसखुशीत शेंगदाणा चिक्की (Peanut Chikki)
शेंगदाणा चिक्की हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पौष्टिक आणि कुरकुरीत पदार्थ आहे. थंडीच्या दिवसांत गूळ आणि शेंगदाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
शेंगदाणे (Peanuts) १ वाटी चिक्कीचा बारीक चिरलेला गूळ (Jaggery) १ वाटी साजूक तूप (Ghee)
कृती :
- मध्यम आचेवर एका कढईत शेंगदाणे घेऊन ते खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
- शेंगदाणे चांगले भाजले की त्याची साल वेगळी होऊ लागते.
- शेंगदाणे भाजल्यावर एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर हाताने चोळून त्यांची साल काढून टाका.
- साल काढलेले शेंगदाणे वाटीने दाब देत थोडेसे भरडून घ्या.
- त्यानंतर एका कढईत एक वाटी गूळ मंद आचेवर वितळून घ्या.
- त्यात पाणी न वापरता गूळ वितळत आला की एक चमचा तूप घाला.
- पाक तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी, एका वाटीत थंड पाणी घ्या आणि त्यात पाकाचा एक थेंब टाका.
- जर तो थेंब लगेच विरघळला, तर पाक तयार नाही.
- जर तो थेंब खाली जाऊन कडक गोळी (Hard Ball) बनला आणि तो दाताखाली 'कच' असा आवाज करत तुटला, तर पाक तयार झाला आहे असे समजा.
- पाक तयार झाल्यावर लगेच कढई गॅसवरून खाली उतरवा.
- त्यात भरडलेले शेंगदाणे लगेच घाला आणि झटपट एकत्र ढवळून घ्या.
- चिक्कीचे मिश्रण गरम असतानाच, पोळपाट किंवा स्वच्छ ओट्यावर (ज्याला आधी तुपाचा हात लावला आहे) लगेच पसरा.
- यात तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता.
- लाटण्यालाही तूप लावून घ्या आणि मिश्रणावर लाटून त्याला एकसमान जाडी द्या.
- मिश्रण थोडे गरम असतानाच सुरीच्या साहाय्याने हव्या त्या आकाराच्या वड्या कापून घ्या.
- चिक्की पूर्णपणे थंड झाल्यावर (साधारणतः १ तास) वड्या अलगद काढून घ्या आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा.
महत्त्वाच्या टिप्स
कुरकुरीतपणा: चिक्की कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा पाक कडक बनणे अत्यंत आवश्यक आहे.
वेळेचे महत्त्व: गूळ आणि शेंगदाणे एकत्र झाल्यावर मिश्रण खूप लवकर थंड होते. त्यामुळे ढवळणे आणि लाटणे हे काम अतिशय वेगाने करावे लागते.
गूळ: चिक्कीसाठी शक्य असल्यास चिक्कीचा गूळ वापरावा. यामुळे चिक्कीला रंग चांगला येतो आणि पाक व्यवस्थित जमतो.
ड्रायफ्रुट चिक्की सुद्धा करून बघायची असेल तर सोबत दिलेली लिंक अवश्य बघा -
Web Summary : Make delicious, crispy peanut chikki at home! This recipe uses simple ingredients and precise steps for a perfect, non-chewy result. Enjoy this traditional winter snack!
Web Summary : घर पर स्वादिष्ट, कुरकुरी पीनट चिक्की बनाएं! यह रेसिपी सरल सामग्री और सटीक चरणों का उपयोग करके एक परिपूर्ण, गैर-चबाने वाला परिणाम देती है। इस पारंपरिक शीतकालीन नाश्ते का आनंद लें!