Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेफ संजीव कपूर सांगतात ३ टिप्स-कारल्याचा कडूपणा गायब आणि भाजी होईल चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2026 13:08 IST

Kitchen Tips: कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत.. 

कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कारल्याचा कडूपणा कमी करणे अनेक जणींना खरंच जमत नाही. पण त्याचवेळी अशा काही सुगरण महिला असतात की ज्यांच्या हातची कारल्याची भाजी अजिबातच कडू लागत नाही. उलट ती जास्त चवदार, चटपटीत लागते. अशी भाजी तुम्हालाही करायची असेल तर त्यासाठी कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा; याविषयी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेल्या या काही सोप्या ट्रिक्स बघाच...

 

कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा?

१. संजीव कपूर यांनी ज्या काही साध्या सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारले चिरून घेतल्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावा आणि १० ते १५ मिनिटे ते झाकून ठेवा.

ढाराढुर झोपण्याच्या यादीत 'हा' देश आहे सगळ्यात पुढे- बघा भारताचा नंबर कितवा...

यामुळे कारल्यातलं अतिरिक्त पाणी बाहेर येतं आणि कडवटपणा कमी होतो. त्यानंतर हे कारले हाताने थोडेसे दाबून त्याच्यामधलं पाणी काढून टाका आणि मग त्याची भाजी करा. 

२. कारले चिरल्यानंतर त्याच्यातल्या बिया पूर्णपणे बाहेर काढून घ्या. कारण बियांमुळेही भाजीचा कडवटपणा वाढत जातो.

 

३. कारल्याच्या फोडींना काही वेळ व्हिनेगरच्या पाण्यात भिजत ठेवा. यासाठी जर १ लिटर पाणी असेल तर त्यात २ चमचे व्हिनेगर घाला. 

जेवणाआधी आल्याचा छोटासा तुकडा चावून खाणं म्हणजे 'या' त्रासापासून कायमची सुटका, वाचा २ मोठे फायदे

४. आंबट दह्याचं पातळ ताक करून घ्या. या ताकामध्ये कारल्याच्या फोडी अर्धा तास भिजत ठेवा. यानंतर त्या फोडींची भाजी केल्यास कारले अजिबात कडू लागणार नाही. त्याला दह्याचा छान फ्लेवर येईल. 

५. १ लीटर पाण्यामध्ये १ चमचा साखर आणि १ टीस्पून मीठ घाला. यामध्ये कारल्याच्या फोडी १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. कारल्याचा कडवटपणा कमी होईल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chef Sanjeev Kapoor's tips to reduce bitterness and make karela delicious.

Web Summary : Chef Sanjeev Kapoor shares simple tricks to reduce karela's bitterness. Soak sliced karela with salt, remove seeds, or use vinegar/buttermilk. These methods ensure a tasty, non-bitter dish.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स