lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

Roti Sandwich Recipe: पोळी भाजी असं तेच ते खाण्याचा मुलांना खूपदा कंटाळा येतो. अशावेळी हा एक छान उपाय करता येईल. पोळी भाजी दोन्ही पटापट संपेल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 01:32 PM2023-08-17T13:32:40+5:302023-08-17T13:44:26+5:30

Roti Sandwich Recipe: पोळी भाजी असं तेच ते खाण्याचा मुलांना खूपदा कंटाळा येतो. अशावेळी हा एक छान उपाय करता येईल. पोळी भाजी दोन्ही पटापट संपेल....

Chapati sandwich from leftover roti, How to make sandwich from roti? roti sandwich recipe  | मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

Highlights उरलेल्या पोळ्यांचे सॅण्डविज हा एक उत्तम बेत ठरू शकतो मुलांना डब्यामध्ये द्यायलाही हा पदार्थ चांगला आहे. किंवा कधीतरी दुपारच्या चहासोबत घ्यायला स्नॅक्स म्हणूनही उत्तम आहे.

मुलांना सतत काहीतरी वेगळंच खायला पाहिजे असतं. काहीतरी टेस्टी दे, काहीतरी यम्मी दे असा त्यांचा आग्रह असतो. पोळी खाण्याचाही कंटाळा येतो. अशावेळी त्यांना काहीतरी पौष्टिक पण चवदार द्यायचं असेल तर पोळ्यांचे सॅण्डविज ( roti sandwich recipe) करून द्या. मुलांना डब्यामध्ये द्यायलाही हा पदार्थ चांगला आहे. किंवा कधीतरी दुपारच्या चहासोबत घ्यायला स्नॅक्स म्हणूनही उत्तम आहे. कधी कधी रात्री दुपारच्या पोळ्या खूप उरलेल्या असतात. अशावेळी मुलांनाच काय पण मोठ्या मंडळींनाही पोळी- भाजी खाण्याचा कंटाळा येतो. त्यावेळी उरलेल्या पोळ्यांचे सॅण्डविज हा एक उत्तम बेत ठरू शकतो (Chapati sandwich from leftover rotis). बघा पोळ्यांचं सॅण्डविज करण्याची रेसिपी...(How to make sandwich from roti?)

 

पोळ्यांचे सॅण्डविज करण्याची रेसिपी
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या agarnishbowl या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
उरलेल्या पोळ्या

कांदा, सिमला मिरची, पत्ताकोबी या किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या

लहान माझी बाहुली!! कारखान्यांमध्ये कशी तयार होते घाऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची बाहुली? बघा व्हायरल व्हिडिओ

टोमॅटो सॉस, चिली सॉस, शेजवान सॉस

ओरिगॅनो

बटर आणि मेयोनिज

 

पोळ्यांचे सॅण्डविज रेसिपी
१. सगळ्यात आधी पोळ्यांचे ब्रेडच्या आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या.

२. त्यानंतर वर सांगितलेल्या भाज्या आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या बारीक बारीक चिरून घ्या.

शिल्पा शेट्टी म्हणते हिंमत असेल तर स्वीकारा माझे फिटनेस चॅलेंज? बघा, किती आहात फ्लेक्झिबल..

३. आता एका भांड्यात बारीक चिरलेल्या भाज्या, तुमच्या आवडीचे वेगवेगळे सॉस, मेयोनीज असं सगळं घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या.

४. आता पोळीच्या एका कापवर भाज्यांचं मिश्रण ठेवा आणि त्यावर पोळीचा दुसरा काप ठेवा. दोनी पोळीच्या कापांना बाहेरच्या बाजुने बटर लावून घ्या. आता हे सॅण्डविज मेकरमध्ये ठेवून ग्रील करून घ्या. गरमागरम चवदार सॅण्डविज तयार...

 

ही आणखी एक रेसिपी बघून घ्या..
पोळ्यांचे चौकोनी काप केल्यावर पोळीचा आजुबाजुचा जो भाग उरतो, त्याचे एकसारखे काप करा. तवा गरम करून त्यावर बटर टाका.

पितळेची भांडी, जळकट कढई- तवा ५ मिनिटांत होतील चकाचक.. वाळलेल्या लिंबाचा करा खास उपयोग

त्यात हे पोळीचे काप टाका. त्यावर तिखट, चाटमसाला, मीठ घाता. थोडावेळ गॅस चालू ठेवा. पोळीचे क्रिस्पी, कुरकुरीत पापड तयार... 

 

Web Title: Chapati sandwich from leftover roti, How to make sandwich from roti? roti sandwich recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.