lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

Kunal Kapur Will Cook Veg Khichada At The G-20 Summit in Delhi: दिल्ली येथे सध्या तीन दिवसीय G 20 परिषद सुरू असून परिषदेसाठी येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व्हेज खिचडा करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2023 02:11 PM2023-09-09T14:11:52+5:302023-09-09T14:13:59+5:30

Kunal Kapur Will Cook Veg Khichada At The G-20 Summit in Delhi: दिल्ली येथे सध्या तीन दिवसीय G 20 परिषद सुरू असून परिषदेसाठी येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर व्हेज खिचडा करणार आहे.

Celebrity Chef Kunal Kapur will cook veg khichada for the First Ladies at the G-20 Summit with authentic Indian flavors in Delhi | G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

G 20 परिषदेसाठी आलेल्या जगभरातील फर्स्ट लेडिजना शेफ कुणाल कपूर शिकवणार व्हेज खिचडा, मिलेट्स स्पेशल झणझणीत दावत

Highlightsव्हेज खिचडासोबतच बाजरीचा खिचडा आणि सलाड हे दोन पदार्थही ते करतील.

सध्या संपूर्ण भारतात गाजत असणारा विषय म्हणजे विविध शहरांमध्ये घेतल्या जाणाऱ्या G 20 परिषद. सध्या दिल्ली येथे या परिषदेला सुरुवात झाली असून शेती आणि तंत्रज्ञान हा विषय तिथे प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे. २०२३ हे वर्ष International Millets Year म्हणून घोषित करण्यात आले आहे. अर्थात यामध्ये भारताचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच मिलेट्स म्हणजेच भरड धान्यांचे उत्पादन, त्यांचे पोषणमुल्य आणि त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी हा या परिषदेचा मुख्य भाग असणार आहेत. म्हणूनच या परिषदेसाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Celebrity Chef Kunal Kapur) यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून ते परिषदेला येणाऱ्या फर्स्ट लेडिजसाठी (First Ladies at the G-20 Summit) खास त्यांच्या स्टाईलमध्ये भरड धान्यांचा व्हेज खिचडा (veg khichada) करणार आहेत.

 

कुणाल कपूर हे फूड इंडस्ट्रीमधलं एक मोठं नाव. त्यांच्या अनेक रेसिपीज प्रसिद्ध असून सोशल मिडियावर त्यांचे फॉलोव्हर्सही प्रचंड आहेत.

पुरण शिजवताना शिट्टी होताच कुकरमधून पाणी फसफसत बाहेर येतं? २ टिप्स- डाळही शिजेल मऊ

या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं, हा माझ्यासाठी एक बहुमान आहे, असं सांगत कुणाल यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. ते परिषदेमध्ये नेमके कोणते पदार्थ करणार आहेत आणि त्या पदार्थांची काय खासियत असणार आहे, याविषयीची माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.

 

कुणाल म्हणतात की सामान्यपणे आपल्याला खिचडी माहिती असते. पण खिचडा हा खिचडीपेक्षा थोडा वेगळा पदार्थ असतो. कारण तो मांसाहारी पदार्थ आहे.

भात- खिचडी झटपट शिजवली पण कुकरचे झाकण लवकर कसे उघडायचे? २ टिप्स, पटकन जाईल वाफ

पण खास या परिषदेसाठी ते भरड धान्यांपासून तयार होणारा व्हेज खिचडा करून दाखवणार आहेत. व्हेज खिचडा करूनही मुळ खिचडाची चव कायम राहावी, म्हणून ते त्यामध्ये मशरुमचा वापर करणार आहेत. व्हेज खिचडासोबतच बाजरीचा खिचडा आणि सलाड हे दोन पदार्थही ते करतील. भरड धान्यांच्या व्हेज खिचडाची रेसिपी कशी असेल, याबाबतची माहिती त्यांनी अजून दिलेली नाही. मात्र लवकरच त्यांच्या सोशल मिडिया पोस्टद्वारे ती खवय्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. 


 

Web Title: Celebrity Chef Kunal Kapur will cook veg khichada for the First Ladies at the G-20 Summit with authentic Indian flavors in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.