गाजराचा हा ज्यूस केवळ चवीला मस्त नसून आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस घेतल्यास शरीराला ऊर्जा, ताजेपणा आणि नैसर्गिक चमक मिळते. हे पेय नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. हे शरीर शुद्ध ठेवते, त्वचा सुंदर ठेवते आणि दिवसाची सुरुवात मस्त करते. या ज्यूसमध्ये पाणी घातल्यामुळे तो हलका आणि पचायला सोपा होतो. चवीच्या दृष्टीने हा ज्यूस थोडासा गोडसर, थोडासा आंबट आणि आल्यामुळे जरा तिखटसर लागतो. त्यामुळे आरोग्यासोबतच स्वादाची मजाही मिळते. यात कॅलरी कमी आणि पोषणसत्त्वे जास्त असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे.
गाजरात बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्व ए आणि अँण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवतात. (Carrot Shots: This drink will be beneficial for health, four tablespoons every morning, keeps the skin beautiful)संत्र्यात भरपूर जीवनसत्त्व सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकल्यासारख्या त्रासांपासून संरक्षण मिळते. लिंबू शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि पचन सुधारते. त्याचबरोबर आलं शरीरातील सूज कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि थंडीच्या दिवसांत शरीराला उब देते.
साहित्य गाजर, संत्री, लिंबू, आलं, पाणी
कृती१. आल्याचा लहान तुकडा सोलून घ्यायचा. लिंबाचा रस काढून घ्यायचा. संत्रं सोलायचं. संत्र्याच्या बिया काढून घ्यायच्या. त्याचे तुकडे करायचे. गाजर सोलून घ्यायचे. सोलून झाल्यावर त्याचे तुकडे करुन घ्यायचे.
२. एका मिक्सरच्या भांड्यात गाजराचे तुकडे घ्यायचे. तसेच आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रसही त्यात घाला. संत्र्याचे तुकडे घालायचे. दोन गाजर, दोन संत्री लहान आल्याचा तुकडा आणि एक चमचाभर लिंबाचा रस हे प्रमाण अगदी योग्य ठरते. सारे पदार्थ व्यवस्थित वाटून घ्यायचे.
३. त्यात पाणी घालायचे आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवायचे. त्याची पातळ पेस्ट तयार करायची. मग एका खोलगट पातेल्यावर पातळ कापड ठेवायचे, गाळून घ्यायचे. थोडे पाणी घाला आणि रस पिळून घ्या. त्याचा फक्त चोथा ठेवा बाकी सगळा अर्क काढून घ्या. लहान बाटलीत भरुन ठेवा आणि फ्रिजला ठेऊन द्या. आठवडाभर तो रस टिकतो. रोज सकाळी वाटीभर प्या.
Web Summary : Carrot juice is tasty and healthy, providing energy and a natural glow. This detox drink purifies the body, enhances skin, and kickstarts the day. It's low in calories, rich in nutrients, and aids in weight management. The combination of carrot, orange, lemon, and ginger boosts immunity and reduces inflammation.
Web Summary : गाजर का जूस स्वादिष्ट और स्वस्थ है, जो ऊर्जा और प्राकृतिक चमक प्रदान करता है। यह डिटॉक्स ड्रिंक शरीर को शुद्ध करता है, त्वचा को निखारता है और दिन की शुरुआत शानदार करता है। यह कैलोरी में कम, पोषक तत्वों से भरपूर और वजन प्रबंधन में सहायक है। गाजर, संतरा, नींबू और अदरक का संयोजन प्रतिरक्षा को बढ़ाता है और सूजन को कम करता है।