Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Breakfast Recipe : नाश्त्याला करा ज्वारीची चविष्ट उकड, लसूण घालून करा पौष्टिक रेसिपी

Breakfast Recipe : नाश्त्याला करा ज्वारीची चविष्ट उकड, लसूण घालून करा पौष्टिक रेसिपी

Breakfast Recipe: Make a delicious jawar recipe for breakfast, add garlic and make a nutritious recipe : चविष्ट जावारीची उकड नक्की खा. पोटाला आराम मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2025 18:39 IST2025-10-29T18:31:35+5:302025-10-29T18:39:05+5:30

Breakfast Recipe: Make a delicious jawar recipe for breakfast, add garlic and make a nutritious recipe : चविष्ट जावारीची उकड नक्की खा. पोटाला आराम मिळेल.

Breakfast Recipe: Make a delicious jawar recipe for breakfast, add garlic and make a nutritious recipe | Breakfast Recipe : नाश्त्याला करा ज्वारीची चविष्ट उकड, लसूण घालून करा पौष्टिक रेसिपी

Breakfast Recipe : नाश्त्याला करा ज्वारीची चविष्ट उकड, लसूण घालून करा पौष्टिक रेसिपी

ज्वारीच्या पिठाची  उकड करायला अगदीच सोपी असते. तसेच चवीला मस्त असते. रेसिपी अगदी तांदूळाच्या उकडीप्रमाणाचे असते. फार काही वेगळे नाही. (Breakfast Recipe: Make a delicious jawar recipe for breakfast, add garlic and make a nutritious recipe)मात्र चव वेगळी असते. तेलाचा वापर कमी करुन तूप वापरले तर हा अगदी पौष्टिक पदार्थ आहे. नक्की करुन पाहा. नाश्त्यासाठी अगदी मस्त पदार्थ आहे. 

साहित्य 
ज्वारीचे पीठ, तेल, आलं, लसूण, हिरवी मिरची, कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, हिंग, ताक, मीठ कोथिंबीर 

कृती
१. एका खोलगट भांड्यात ताक घ्यायचे. तीन वाटी ताकासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे. ताकात ज्वारीचे पीठ घालायचे आणि व्यवस्थित घुसळून घ्यायचे. त्यात अजिबात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्यात चमचाभर मीठ आणि हळद घालून ढवळून घ्यायचे. 

२. भरपूर लसूण सोलून घ्यायची. लसणाचीच चव महत्त्वाची असते. त्यामुळेच पदार्थाला खाण्यात मजा येते. कडीपत्ताही जास्त घ्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीरीची जुडी निवडायची. तसेच धुवायची आणि बारीक चिरुन घ्यायची. 

३. एका कढीत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. दोन्ही पदार्थ मस्त तडतडल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. लसणाच्या पाकळ्या घालायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि छान परतायचे. परतून झाल्यावर त्यात हिंग घाला. फोडणी छान परतून झाली की त्यात ज्वारीचे पीठ ओता. ढवळून घ्या. वाफ काढून घ्या. जरा घट्ट झाले की गॅस बंद करा. 

४. एका फोडणीपात्रात चमचाभर तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्ता घाला. तसेच लसूण घाला. मस्त खमंग फोडणी तयार करा. गॅस बंद करा जरा तेल कोमट झाल्यावर चमचाभर लाल तिखट घाला. तयार फोडणी ज्वारीच्या उकडमध्ये ओता आणि ढवळा. पदार्थाची चव वाढते.    

Web Title : ज्वार उपमा: लहसुन के साथ एक स्वादिष्ट और पौष्टिक नाश्ता

Web Summary : ज्वार के आटे से बना एक सरल, पौष्टिक नाश्ता, जिसमें लहसुन, करी पत्ते और मसालों का तड़का लगाया गया है। पारंपरिक उपमा के लिए यह एक स्वस्थ, स्वादिष्ट विकल्प है। यह बनाने में आसान और झटपट नाश्ते के लिए उत्तम है।

Web Title : Jowar Upma: A Delicious and Nutritious Breakfast Recipe with Garlic

Web Summary : A simple, nutritious breakfast recipe using jowar flour, tempered with garlic, curry leaves, and spices. Enjoy this healthy, flavorful alternative to traditional upma. It's easy to make and perfect for a quick, nutritious meal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.