Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या चण्याचे चाट म्हणजे प्रोटीनचा पावर पॅक - रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 16:24 IST

Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner : हा चाटचा प्रकार चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही.

काळे चणे हा प्रोटीनचा मस्त स्त्रोत आहे. याशिवाय काळ्या चण्यात फायबरचे प्रमाणही भरपूर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, पोट साफ राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही काळ्या चण्याचे चाट उपयुक्त ठरते. काळ्या चण्यात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात. (Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner)आयर्नमुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवतात. पोटॅशियममुळे शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत होते. हे चाट पोटभरीचे होते. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्यकाळे चणे, रताळं, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, आमचूर, जिरे, टोमॅटो, कांदा, काकडी, पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंच, पुदिना, लिंबू, तेल

कृती१. काळे चणे रात्रभर भिजत ठेवायचे. रताळं उकडून घ्यायचं आणि मग सोलून घ्यायचं. त्याचे तुकडे करायचे. टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचा. कांदा सोलायचा आणि मग बारीक चिरायचा. काकडी सोलून घ्यायची आणि मस्त चिरुन घ्यायची. चिंच कोमट पाण्यात भिजत ठेवायची. 

२. चिंच हाताने कुस्करुन घ्यायची. त्याचा गर काढून घ्यायचा आणि चोथा गाळून वेगळा करायचा. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात पुदिना घालायचा. तसेच पाणी आणि मीठ घालायचे. तयार केलेले चिंचेचे पाणी घालायचे. थोडी हिरवी मिरचीही घालायची आणि चटणी वाटून घ्यायची.

३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे त्यावर काळे चणे परतून घ्यायचे. मस्त खमंग परता मग त्यावर पनीरचे तुकडेही परतून घ्यायचे. दोन्ही छान परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे. तसेच लाल तिखट घालायचे. थोडे पाणी घाला आणि मस्त परतून घ्यायचे. 

४. एका वाडग्यात परतलेले चणे आणि पनीर घ्यायचे. त्यात चिरलेला कांदा घालायचा. काकडी घालायची आणि टोमॅटोही घालायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. रताळ्याचे तुकडे घाला तसेच आमचूर पावडरही घाला. लिंबू पिळा. तयार केलेली चटणी घालून सगळं मिक्स करुन घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Black Chickpea Chaat: Protein Powerhouse, Perfect Dinner Recipe

Web Summary : Black chickpea chaat is a protein and fiber-rich dish aiding digestion and weight control. Packed with iron, calcium, and potassium, it boosts hemoglobin and strengthens bones. This filling chaat combines black chickpeas, sweet potato, and various spices with fresh vegetables for a flavorful and nutritious meal.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना