Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > काळ्या चण्याचे चाट म्हणजे प्रोटीनचा पावर पॅक - रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त रेसिपी

काळ्या चण्याचे चाट म्हणजे प्रोटीनचा पावर पॅक - रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त रेसिपी

Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner : हा चाटचा प्रकार चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 16:24 IST2026-04-02T16:22:49+5:302026-04-02T16:24:18+5:30

Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner : हा चाटचा प्रकार चविष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही.

Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner | काळ्या चण्याचे चाट म्हणजे प्रोटीनचा पावर पॅक - रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त रेसिपी

काळ्या चण्याचे चाट म्हणजे प्रोटीनचा पावर पॅक - रात्रीच्या जेवणासाठी एकदम मस्त रेसिपी

काळे चणे हा प्रोटीनचा मस्त स्त्रोत आहे. याशिवाय काळ्या चण्यात फायबरचे प्रमाणही भरपूर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, पोट साफ राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही काळ्या चण्याचे चाट उपयुक्त ठरते. काळ्या चण्यात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात. (Black gram chaat is a protein power pack - a perfect recipe for dinner)आयर्नमुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवतात. पोटॅशियममुळे शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत होते. हे चाट पोटभरीचे होते. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य
काळे चणे, रताळं, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, आमचूर, जिरे, टोमॅटो, कांदा, काकडी, पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, चिंच, पुदिना, लिंबू, तेल

कृती
१. काळे चणे रात्रभर भिजत ठेवायचे. रताळं उकडून घ्यायचं आणि मग सोलून घ्यायचं. त्याचे तुकडे करायचे. टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचा. कांदा सोलायचा आणि मग बारीक चिरायचा. काकडी सोलून घ्यायची आणि मस्त चिरुन घ्यायची. चिंच कोमट पाण्यात भिजत ठेवायची. 

२. चिंच हाताने कुस्करुन घ्यायची. त्याचा गर काढून घ्यायचा आणि चोथा गाळून वेगळा करायचा. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात पुदिना घालायचा. तसेच पाणी आणि मीठ घालायचे. तयार केलेले चिंचेचे पाणी घालायचे. थोडी हिरवी मिरचीही घालायची आणि चटणी वाटून घ्यायची.

३. एका कढईत थोडे तेल घ्यायचे त्यावर काळे चणे परतून घ्यायचे. मस्त खमंग परता मग त्यावर पनीरचे तुकडेही परतून घ्यायचे. दोन्ही छान परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे. तसेच लाल तिखट घालायचे. थोडे पाणी घाला आणि मस्त परतून घ्यायचे. 

४. एका वाडग्यात परतलेले चणे आणि पनीर घ्यायचे. त्यात चिरलेला कांदा घालायचा. काकडी घालायची आणि टोमॅटोही घालायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. रताळ्याचे तुकडे घाला तसेच आमचूर पावडरही घाला. लिंबू पिळा. तयार केलेली चटणी घालून सगळं मिक्स करुन घ्या. 

Web Title : काला चना चाट: प्रोटीन का पावरहाउस, रात के खाने के लिए उत्तम रेसिपी

Web Summary : काला चना चाट प्रोटीन और फाइबर से भरपूर होता है, जो पाचन और वजन नियंत्रण में सहायक है। आयरन, कैल्शियम और पोटेशियम से भरपूर, यह हीमोग्लोबिन बढ़ाता है और हड्डियों को मजबूत करता है। यह भरने वाला चाट काले चने, शकरकंद और विभिन्न मसालों को ताजी सब्जियों के साथ मिलाकर एक स्वादिष्ट और पौष्टिक भोजन बनाता है।

Web Title : Black Chickpea Chaat: Protein Powerhouse, Perfect Dinner Recipe

Web Summary : Black chickpea chaat is a protein and fiber-rich dish aiding digestion and weight control. Packed with iron, calcium, and potassium, it boosts hemoglobin and strengthens bones. This filling chaat combines black chickpeas, sweet potato, and various spices with fresh vegetables for a flavorful and nutritious meal.