काळ्या चण्याची उसळ आवडते? चवीला मस्त असते आणि पौष्टिकही. चणे त्याच एका पद्धतीने करत असाल तर एकदा ही रेसिपी करुन पाहा. पालक आणि काळे चणे एकत्र फारच वेगळे आणि मस्त लागतात. (black gram and spinach curry recipe - tasty and easy recipe, must try food )एकदा ही रेसिपी केली तर सारखी कराल. अगदी सोपी आहे. पाहा काय करायचे.
साहित्यकाळे चणे, पालक, मीठ, पाणी, तेल, जिरे, कांदा, आलं, लसूण, दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर
कृती१. काळे चणे रात्रभर भिजत ठेवायचे. सकाळी त्याचं पाणी काढून टाकायचं आणि एका कुकरमध्ये चणे घ्यायचे. त्यात मीठ घालायचं. पाणी घालायचं आणि चणे शिजवून घ्यायचे. शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी फेकू नका. त्याची चव मस्त लागते तसेच त्याचा भाजीत वापरही करता येतो.
२. पालक निवडायचा. छान स्वच्छ करुन घ्यायचा. त्याचे देठ काढून टाकायचे. एका पातेल्यात पाणी गरम करायचं त्यात थोडं मीठ घालायचं आणि त्यात पालक उकळून घ्यायचा, पालक उकळून झाल्यावर थंड पाण्यात ठेवायचा. त्याचं पाणी काढून टाकायचं आणि पालक मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात दही घालायचं, थोडी हिरवी मिरची घालायची. गरजेनुसार पाणी घालायचं आणि पेस्ट वाटून घ्यायची.
३. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि त्याची पेस्ट तयार करायची. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरुन घ्यायची.
४. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यावर जिरे परतायचे. जिरं मस्त फुलू द्या मग त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. आलं लसूण पेस्ट घाला आणि कांदा घाला. कांदा मस्त खमंग परतून घ्यायचा. कांदा छान गुलाबी झाला की त्यात तयार केलेली पालकाची पेस्ट घालायची. चमचाभर हळद घालायची. लाल तिखट घालायचे. गरम मसाला घालायचा. चवीनुसार मीठ घालायचे आणि एक उकळी काढून घ्यायची.
५. शेवटी त्यात शिजवलेले चणे घालायचे. चण्याचे पाणी घालून उकळवायचे. पाणी आटून भाजी जरा घट्ट होऊ द्यायची. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. गरमागरम पोळी, भात सगळ्यासोबत मस्त लागते.
Web Summary : Enjoy a flavorful black chickpea and spinach curry! Soak chickpeas overnight, cook, and blend spinach with yogurt and spices. Sauté onions, add spinach paste, spices, and chickpeas. Simmer until thickened and garnish with cilantro. Serve hot with roti or rice.
Web Summary : स्वादिष्ट काले चने और पालक की करी का आनंद लें! चने रात भर भिगोएँ, पकाएँ और पालक को दही और मसालों के साथ मिलाएँ। प्याज भूनें, पालक का पेस्ट, मसाले और चने डालें। गाढ़ा होने तक उबालें और धनिया से सजाएँ। रोटी या चावल के साथ गरमागरम परोसें।