Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मेथीचे ४ कडू दाणे, खा न सांगता कुठलेही बहाणे! तब्येत धडधाकट ठेवण्याचा सोपा उपाय लक्षात ठेवा..

मेथीचे ४ कडू दाणे, खा न सांगता कुठलेही बहाणे! तब्येत धडधाकट ठेवण्याचा सोपा उपाय लक्षात ठेवा..

Bitter fenugreek seeds, remember this simple remedy to stay healthy, eat it daily in this way : मेथीचे दाणे आरोग्यासाठी ठरतात फार फायद्याचे. पाहा आहारात समावेश कसा करावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 11:35 IST2025-12-05T11:34:00+5:302025-12-05T11:35:02+5:30

Bitter fenugreek seeds, remember this simple remedy to stay healthy, eat it daily in this way : मेथीचे दाणे आरोग्यासाठी ठरतात फार फायद्याचे. पाहा आहारात समावेश कसा करावा.

Bitter fenugreek seeds, remember this simple remedy to stay healthy, eat it daily in this way | मेथीचे ४ कडू दाणे, खा न सांगता कुठलेही बहाणे! तब्येत धडधाकट ठेवण्याचा सोपा उपाय लक्षात ठेवा..

मेथीचे ४ कडू दाणे, खा न सांगता कुठलेही बहाणे! तब्येत धडधाकट ठेवण्याचा सोपा उपाय लक्षात ठेवा..

मेथीचे दाणे दिसायला साधे असले तरी त्यांच्यात दडलेले गुणधर्म शरीराला आतून बळ देतात. अनेक घरांमध्ये हे दाणे फक्त मसाल्यात वापरले जातात, पण खरं तर मेथीचे दाणे हे पचन, रक्तशर्करा, त्वचा आणि सांधे अशा सर्व स्तरांवर आरोग्यासाठी उपयुक्त असतात. (Bitter fenugreek seeds, remember this simple remedy to stay healthy, eat it daily in this way  )त्यांच्या चवीतील किंचित कडूपणामुळे काहीजण खाणे टाळतात, पण नियमितपणे थोड्या प्रमाणात खाल्यास हे दाणे शरीराचे अनेक त्रास शांत करतात.

मेथीचे दाणे पचन सुधारण्यासाठी अगदी खास आहेत. थोडेसे दाणे भिजवून सकाळी खाल्ले की पोट हलके राहते, गॅसेस तयार होत नाहीत आणि बद्धकोष्ठता कमी होते. संथ पचन असलेल्या लोकांना तर हे दाणे वरदानच ठरतात. त्यातील नैसर्गिक तंतू आतड्यांची हालचाल योग्य राखतात आणि पोटात उष्णता निर्माण करून अन्न पचण्यास मदत करतात.

हे दाणे रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयोगी ठरतात. मेथीच्या दाण्यांतील विशेष घटक इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात काही प्रमाणात मेथीचा समावेश करणे फायदेशीर मानले जाते.

मेथीचे दाणे महिलांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. पाळीचा अनियमितपण, अंगातील सूज किंवा हार्मोनमधील असंतुलन या सर्वांवर मेथी हळूहळू परिणाम करते. शरीरातील सूज कमी करणे, स्नायूंना आराम देणे आणि मन शांत ठेवणे हे तिचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. सांध्यात वेदना किंवा stiffness जाणवत असल्यास मेथीचा उबदार त्यावर मोठा दिलासा देतो.

पोषणाच्या दृष्टीने हे दाणे अत्यंत समृद्ध आहेत. त्यात तंतुमयता, प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स अशी अनेक महत्त्वाची पोषकतत्त्वे असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारे अँटी ऑक्सिडंट्स तर मेथीत भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेला तजेला मिळतो, थकवा कमी होतो आणि शरीरातील सूजही कमी होते.

दैनंदिन आहारात मेथीचे दाणे सहजपणे सामावून घेता येतात. रात्री एक चमचा दाणे भिजवून सकाळी ते पाणी प्यायचे. असे केले तर ते पचन आणि साखर दोन्ही संतुलित ठेवतात. तडका किंवा फोडणी तयार करताना काही दाणे मेथीचे घातले तर चव वाढते आणि शरीराला औषधी फायदा मिळतो. मेथीची पूड दही किंवा ताकात मिसळून घेतली तर गॅसेस दूर होतात. थोडक्यात, मेथीचे दाणे हे रोजच्या आहारातील छोटे पण फायद्याचा पदार्थ आहे. त्यांना नियमित, योग्य प्रमाणात वापरले तर शरीर अधिक मजबूत, हलके आणि निरोगी राहते. मेथीचा कडूपणा त्या मिळणाऱ्या फायद्यांसमोर अगदी सहनशील वाटतो.

Web Title : मेथी के दाने: छोटे, कड़वे, पर शक्तिशाली स्वास्थ्य वर्धक; रोजाना सेवन करें।

Web Summary : मेथी के दाने पाचन में सहायक, रक्त शर्करा को नियंत्रित करते हैं और महिलाओं के स्वास्थ्य के लिए फायदेमंद हैं। पोषक तत्वों और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, वे प्रतिरक्षा को बढ़ावा देते हैं और सूजन को कम करते हैं। स्वस्थ शरीर के लिए इन्हें अपने दैनिक आहार में शामिल करें।

Web Title : Fenugreek seeds: Small, bitter, but mighty health boosters; consume daily.

Web Summary : Fenugreek seeds aid digestion, control blood sugar, and benefit women's health. Rich in nutrients and antioxidants, they boost immunity and reduce inflammation. Add them to your daily diet for a healthier, stronger body.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.