गरमागरम डोसा खाण्याची मजाच काही वेगळी. हॉटेलस्टाईलचा कुरकुरीत डोसा घरीच बनवणं सोपं असते. बऱ्याच लोकांना डोसा करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा याची माहिती नसते. युट्यूबर रुचिकानं कुरकुरीत, परफेक्ट डोसा होण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. जेणेकरून डोसा तुटणार नाही आणि चिकटणारही नाही. (Best Rice To make Dosa) यात त्यांनी डोश्याचं पीठ दळण्यापासून ते डोसा तव्यावर पसरवण्यापर्यंत बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत.
परफेक्ट डोसा करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा? (Which Kind Of Rice Is Used To Make Dosa)
डोसा कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पदार्थ तांदूळ आहे. लोक डोसा करण्यासाठी बासमती किंवा अशा तांदळाचा वापर करता जो शिजल्यानंतर एकदम सुका आणि मोकळा होतो. रुचिका सांगतात की हे तांदूळ वापरल्यामुळे डोसा तुटतो. भात केल्यानंतर मऊ, गचका होतो असा तांदूळ डोशासाठी निवडायला हवा. जसं की साऊथ इंडियन डोसा राईस किंवा सोना मसूरी राईस असं म्हटलं जातं.
या तांदळात स्टार्चचे प्रमाण बरेच असते. ज्यामुळे बॅटर बाईंडींग व्यवस्थित होते. डोसा तव्यावर पसरवल्यानंतर तुटत नाही. डोसा बॅटर तयार करण्यासाठी १ कप उडीद डाळ, ३ कप तांदूळ घ्या. डोश्याची चव आणि टेक्स्टचर व्यवस्थित येण्यासाठी डोश्याचे बॅटर वाटणं गरजेचं आहे. रात्रभर भिजवलेलं डाळ-तांदूळ मिसळून हलके वाटून घ्या. बॅटर एकदम बारीक करू नका. थोडं जाडसर ठेवा. वाटलेलं पीठ एका भांड्यात काढून घ्या आणि ६ ते ८ तास फर्मेंट करण्यासाठी ठेवा.
कोणता तवा वापरायचा?
कुरकुरीत डोसा करण्याासठी आतला मसालासुद्धा क्रिस्पी असायला हवा. जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर डोसा असाल तर तो नॉनस्टीक तव्यापेक्षा जास्त कुरकुरीत बनेल. डोसा बॅटर घालण्याआधी डोसा व्यवस्थित गरम करून घ्या. त्यावर पाणी शिंपडून नंतर पुसून घ्या. यामुळे तव्याचं तापमान संतुलित राहील आणि तवा जास्त गरम होणार नाही.
तव्याचं तापमान योग्य झाल्यानंतर बॅटर घालून चमच्यानं गोल फिरवत पातळ पसरवा. थोड्या वेळानं काठ आणि वरच्या भागाला थोडं तेल किंवा तूप लावा. जेव्हा डोसा सोनेरी होईल तेव्हा आरामात काढा. बटाट्याच्या पिवळ्या भाजीचं मिश्रण आत भरून नंतर डोसा फोल्ड करा. हा डोसा गरमागरम सांबर आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
