Lokmat Sakhi >Food > बंगाली मसुर डाळीचे भरीत एकदा नक्कीच खाऊन पाहा, भन्नाट रेसिपी- करायला अगदीच सोपी

बंगाली मसुर डाळीचे भरीत एकदा नक्कीच खाऊन पाहा, भन्नाट रेसिपी- करायला अगदीच सोपी

Bengali Masur Dal Makha is a must try, a delicious recipe - very easy to make : भातासोबत खाण्यासाठी ही बंगाली रेसिपी एकदा करुन पाहा. चवीला मस्त करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 16:27 IST2025-05-29T16:27:08+5:302025-05-29T16:27:59+5:30

Bengali Masur Dal Makha is a must try, a delicious recipe - very easy to make : भातासोबत खाण्यासाठी ही बंगाली रेसिपी एकदा करुन पाहा. चवीला मस्त करायला सोपी.

Bengali Masur Dal Makha is a must try, a delicious recipe - very easy to make | बंगाली मसुर डाळीचे भरीत एकदा नक्कीच खाऊन पाहा, भन्नाट रेसिपी- करायला अगदीच सोपी

बंगाली मसुर डाळीचे भरीत एकदा नक्कीच खाऊन पाहा, भन्नाट रेसिपी- करायला अगदीच सोपी

भातासोबत आपल्याला डाळ खायची सवय आहेच मात्र कधी जरा सुकी डाळ खाल्ली आहे का? (Bengali Masur Dal Makha is a must try, a delicious recipe - very easy to make)बंगालमध्ये या पदार्थाला डाळ भरता असे म्हणतात. तर इतर काही ठिकाणी त्याला मसुर माखा म्हणतात. हा पदार्थ करायला फारच सोपा आहे. चवीलाही अगदी छान लागतो. 

साहित्य 
मसूर डाळ, मीठ, पाणी, हळद, तेल, लसूण, लाल मिरची, कांदा, कोथिंबीर

कृती
१. मसूर डाळ व्यवस्थित धुवायची. मग कुकरच्या भांड्याच घ्यायची आणि छान शिजवायची. कुकर न लावता साध्या पातेल्यात शिजवली तरी चालेल. फक्त पाणी जास्त ठेवायचे नाही. डाळ घट्ट राहायला हवी अगदी पातळ नाही. त्यामुळे पाणी कमीच ठेवायचे. कुकरमध्येही पाणी कमीच घाला. 

२. डाळ मस्त शिजल्यावर एका कढईत घ्यायची आणि परतायची. त्याचे पाणी आटेल याची काळजी घ्यायची. डाळ घट्ट झाल्यवार गार करत ठेवायची. गार झाली की त्याचा गोळा होईल. तशीच डाळ आपल्याला हवी आहे. 

३. एका फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यवार त्यात लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. त्या मस्त परतल्या की काढून घ्या. मग त्यात लाल मिरची घालायची. कुरकुरीत होईपर्यत परतायची. मग लसणासोबत मिरची ठेवायची. फोडणीसाठी घेतलेले तेलही घ्यायचे. हाताने लसूण व मिरची छान कुसकरुन घ्यायची. मग त्यात चमचाभर मीठ घालायचे आणि मस्त बारीक चिरलेला कांदा घालायचा. 

४. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. धुवायची आणि मग मस्त बारीक चिरुन घ्यायची. चिरलेली कोथिंबीर त्या मिश्रणात घालायची. सगळं छान एकजीव करायचे. मग त्यात मसूर डाळ घालायची. हाताने सगळे पदार्थ एकत्र करायचे. त्यात फोडणी साठी वापरलेले तेल घालायचे. 

५. मस्त वाफाळलेला भात घ्यायचा. त्यावर तूप घालायचे. आणि मग मसूर डाळीचा माखा त्यावर ठेवायचा. तुम्हाला जर सुका भात आवडत नसेल तर तुम्ही थोडे साधे वरण त्यावर घेऊ शकता. मात्र मुळात हा पदार्थ फक्त भातासोबतजरा सुकाच खाल्ला जातो. चवीला खरंच मस्त लागतो.     

Web Title: Bengali Masur Dal Makha is a must try, a delicious recipe - very easy to make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.