भारतीय स्वयंपाकात लोण्याला महत्त्वाच आहे. आई किंवा आजी हातावर लोणी खायला देते मात्र आपण काही ते खात नाही. आजकाल लोणी, तूप असे पदार्थ अनहेल्दी समजून खाल्ले जात नाहीत. मात्र मुळात भारतीय वातावरणानुसार लोणी तूप असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. (Benefits of eating 1 spoon of white butter daily, also give it to children too , healthy food)लोणी हे दुधाच्या सायीचे असते आणि त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले गुड फॅट्स, जीवनसत्वे आणि ऊर्जा असते. म्हणूनच बटरपेक्षा पारंपरिक पद्धतीने घरी केलेले लोणी खाणे हा अधिक चांगला पर्याय मानला जातो. बटर आणि लोणी एकच समजत असाल तर तसे नसून दोन्ही पदार्थ वेगळे असतात.
लोण्यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पचनासाठी फायदा होतो. फॅट्स असूनही ते शरीरात पटकन शोषले जाते व ऊर्जा देण्याचे कार्य तत्काळ करते. म्हणूनच लहान मुलांना, खेळाडूंना किंवा जास्त कष्टाचे काम करणाऱ्यांना लोणी उपयुक्त ठरते. थंडीत शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता देखील लोण्यात असते, त्यामुळे हिवाळ्यात लोणी खाण्याचा खास सल्ला दिला जातो. आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीत मेंदूला लागणारे हेल्दी फॅट्स मिळणेही महत्त्वाचे आहे. लोण्यात आढळणारे शॉर्ट आणि मीडियम चेन फॅटी ऍसिड्स मेंदूचे आरोग्य, स्मरणशक्ती आणि मानसिक एकाग्रता वाढवण्यास मदत करतात.
लोणी हे फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्सचे उत्तम स्रोत आहे. जीवनसत्त्व ए दृष्टी व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे, तर डी हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक. जीवनसत्त्व इ हे अँटी ऑक्सिडंट असून त्वचा आणि पेशींना संरक्षण देते, आणि जीवनसत्त्व के रक्ताभिसरण व हाडांचे आरोग्य राखणे या कामांसाठी मदत करते. याशिवाय लोण्यात ओमेगा फॅटी ऍसिड्स, बुटरिक अॅसिड, लिनोलिक अॅसिड अशा घटकांचेही प्रमाण आढळते, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी व दाह कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामुळे लोणी हे फक्त चव वाढवणारे नसून संपूर्ण शरीराच्या पोषणासाठी मदत करणारे घटक देते. त्वचेसाठी लोणी एकदम मस्त असते. त्वचा मऊ मुलायम करते.
घरगुती लोणी हे खास करुन अधिक पौष्टिक मानले जाते कारण ते रसायनविरहित असते. पारंपरिक पद्धतीने घुसळून तयार केलेले लोणी हलके, सुगंधी असते. जेवणात एक चमचा लोणी मिसळल्यास पदार्थाची चव वाढतेच, पण जेवणानंतर तृप्ती जास्त मिळते आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते. लोणी जितके पौष्टिक तितकेच त्याचे अतिसेवन टाळणे आवश्यक आहे. त्यात कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्याने जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढणे, कोलेस्टेरॉलचे प्रमाण बदलणे किंवा पचनात जडपणा जाणवणे अशी समस्या उद्भवू शकते.
Web Summary : A daily spoonful of homemade butter offers vital nutrients, energy, and healthy fats, benefiting digestion, brain health, and skin. Rich in vitamins and fatty acids, it boosts immunity and overall well-being. Moderation is key to avoid weight gain.
Web Summary : रोजाना एक चम्मच घर का बना मक्खन आवश्यक पोषक तत्व, ऊर्जा और स्वस्थ वसा प्रदान करता है, जिससे पाचन, मस्तिष्क स्वास्थ्य और त्वचा को लाभ होता है। विटामिन और फैटी एसिड से भरपूर, यह प्रतिरक्षा और समग्र कल्याण को बढ़ावा देता है। वजन बढ़ने से बचने के लिए संयम महत्वपूर्ण है।